शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रक्रियेला दररोज १ लाख लिटर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:29 IST

चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे. एमआयडीसीकडून हे पाणी मिळावे यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. नक्षत्रवाडी येथे एसटीपी प्रकल्पातील शुद्ध केलेले पाणी वापरण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

चिकलठाणा येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वीजपुरवठा मिळत नसल्याने महापालिकेच्या अडचणीत भर पडत आहे. शुक्रवारी वीज वितरण कंपनीने या कामाची साडेतीन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. त्यामुळे दोन आठवड्यात मनपाला वीज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विजेची अडचण दूर होताच आता पाणी प्रश्नाने डोके वर काढले आहे.

या प्रकल्पासाठी दररोज १ लाख लिटर पाणी लागणार आहे. त्यानुसार टाकीचे बांधकामही करण्यात आले आहे. या भागात पाण्याचाच पत्ता नाही. एक विंधन विहीर असून, या बोअरचे पाणी बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या परिसरातून एमआयडीसीची जलवाहिनी गेली आहे. एमआयडीसीकडे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधील प्रक्रिया केलेले पाणी टँकरने पुरवठा करता येईल का? याची चाचपणी करण्यात येणार आहे.कचरा कोंडीनंतर पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी, चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला.

चिकलठाणा वगळता इतर प्रकल्पांची कामे सुरू आहेत. चिकलठाण्यात छोट्या १६ टन क्षमतेच्या दोन मशीनद्वारे सध्या दररोज ३२ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा अजब दावाही मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दिवसभरात एक टन कचºयावरही प्रक्रिया होत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. छोट्या मशीनद्वारे कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद