चंद्रपूर : केंद्र सरकारकडून दररोज होत असलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात चंद्रपूर जिल्हा युवक कॉंग्रेसतर्फे वाहनाला धक्का मारुन आक्रोश करण्यात आला.
पेट्रोल, डिझेलच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सहा वर्षात अनेक वस्तूंची दुपटीने वाढ झाली आहे. केंद्रसरकार भाववाढ कमी करण्यास अपयशी ठरत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार, जिल्हा प्रभारी इरशाद शेख, माजी अध्यक्ष शिवाराव यांच्या मार्गदर्शनात वाहनाला धक्का मारून व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव सचिन कत्याल, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, सोशल मीडियाचे सुलतान अशरफ अली, महासचिव रमीज शेख, इमरान खान, अजय चिन्नुरवार, वहीद शेख, अक्षय मिस्त्री, राजेश रेवेल्लीवार, वैभव रघाताटे, आतिफ रजा, प्रकाश देशभ्रतार, मनोज समदर, अजय कलवल, प्रवीण अडूर, गणेश कामपेल्ली, व्यंकटेश कलवल, मनीष सिंघ, नफीज भाई, सुफियान आर्यन आदी उपस्थित होते.