शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी निवड झाल्याचे सांगून तरुणीची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:01 IST

Chandrapur : पुण्यातून घोडाझरी अभयारण्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीडः तुमची घोडाझरी अभयारण्यात निवड झाली आहे. मुलाखतीसाठी आपल्याला ९ जानेवारी २०२५ रोजी नागभीड तालुक्यातील घोडाझरी अभयारण्यात हजर राहायचे आहे, अशी एका अज्ञात व्यक्तीकडून बतावणी करण्यात आली. या बतावणीला बळी पडलेल्या या तरुणीने पुण्यावरून सरळ नागभीड गाठले. आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने कपाळावर हात मारून घेतल्याची घटना बुधवारी नागभीड येथे उघडकीस आली.

पूजा संतोष राजगुरू असे या तरुणीचे नाव असून, ती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. वनरक्षक पदासाठी तिने यापूर्वी पुणे विभागात अर्ज केला होता. नेमक्या या संधीचा फायदा घेत एका भामट्याने तरुणीला ऑक्टोबर महिन्यात फोन करून तुमची निवड घोडाझरी अभयारण्यात झाली आहे. 

तुम्ही गणवेश खरेदी करून प्रशिक्षणास हजर राहा, असे फोन करून सांगितले. मात्र, एक-दोन दिवसातच आचारसंहितेमुळे तुमचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती या व्यक्तीने तरुणीला फोनवरूनच दिली. दरम्यान, ४ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा या तरुणीला त्याच व्यक्तीकडून फोन आला. आता आचारसंहिता संपली आहे, तुम्हाला ९ जानेवारीला घोडाझरीत प्रशिक्षणास हजर राहायचे आहे, असे सांगितले. विश्वास ठेवत ही तरूणी पुण्यावरून थेट नागभीड येथे आली. येथे येऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, असे कोणतेही प्रशिक्षण नसल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तिने कपाळावर हात मारून घेतला.

"तरूणी आपल्या पतीसोबत नागभीडच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात बुधवारी सकाळी आली आणि प्रशिक्षणाबाबत विचारू लागली. मात्र, असे कोणतेही प्रशिक्षण नसल्याची माहिती आमच्या कार्यालयाकडून देण्यात आली. त्यानंतर ती परत गेली." - अजय नेरलवार, क्षेत्र सहाय्यक, नागभीड

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरGhodazari Damघोडाझरी धरण