शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

तरुण व्यावसायिकानं स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘मै हार गया हु सॉरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 17:14 IST

एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या कारमध्ये पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर - एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या कारमध्ये पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी (21 ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पदमकुमार सागरमल जैन(लोढा) (वय ४० वर्ष) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचं नाव आहे. ते स्नेहनगर वॉर्ड गजानन मंदिर परिसरातील रहिवासी होते.  मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत ‘मै हार गया हु सॉरी’ अशा आशयाचा मजकूर आढळला आहे. 

पदमकुमार हा प्रापर्टी डिलर्सचे काम करायचा.  सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांनी पेवर्सची फॅक्टरी सुरू केली होती. मागील काही दिवसांपासून प्रापर्टीच्या कामात अपयश येत असल्यामुळे अस्वस्थ असल्याचे समजते.  मिळालेल्या माहितीनुसार, पदमकुमार हे शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्वत:ची कार घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर ते पडोली येथील हनुमान मंदिरात गेले आणि तेथे हनुमान चालिसाचे पठणही केले. तेव्हापासून ते बेपत्ता झाल्याचे समजते. यानंतर रात्री उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने घरातील मंडळींसह नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी शोध घेणे सुरू केले.

पदमकुमारचा मोबाइल सुरू असताना त्याचे लोकेशन एमआयडीसी परिसर दाखवत होते. सदर परिसरातही शोध मोहीम राबविली. मात्र शोध लागला नाही. शनिवारी सकाळी एमआयडीसी परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागील भागात कोसारा मार्गावर फिरायला गेलेल्या काही लोकांना एक कार शुक्रवारपासून एकाच जागेवर उभी आहे, असे लक्षात आले. त्यांनी वाहनाच्या काचातून डोकावून बघितले असता वाहनात पदमकुमार चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. यानंतर लगेच घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, रामनगरचे ठाणेदार प्रदीप गोतमारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव, पो. हवा. मनोहर कांबळी, राजू लाखे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी रवाना झाला. घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी उसळली होती. पदमकुमारने परवाना असलेल्या पिस्तुलातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. 

हनुमान मंदिरात चालिसा पठण

पदमकुमार घरुन बाहेर पडल्यानंतर सरळ पडोली येथील हनुमान मंदिरात गेले. तेथे त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. यानंतर मात्र शनिवारी (21 ऑक्टोबर) सकाळी त्यांचा त्यांच्याच कारमध्ये मृतदेह आढळला.

पिस्तुलातील एक गोळी गायबपदमकुमारकडे परवाना असलेली पिस्तुल होती. त्या पिस्तुलात सहा गोळ्या होत्या. पदमकुमारचा मृत्यू एकाच गोळीने झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र पिस्तुलात चारच गोळ्या आढळून आल्यामुळे एक गोळी कुठे गायब झाली. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

20 वर्षांनी पुनरावृत्तीसुमारे २० वर्षांपूर्वी पदमकुमारचे वडील सागरमल हे दिवाळीच्या दुसऱ्यादिवशी घरातून एकाएकी निघून गेले. तेव्हापासून ते परतलेच नाही.  यानंतर आई व लहान भावाचा सांभाळ पदमकुमारने जबाबदारीने केला. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. तब्बल २० वर्षांनी तेही दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी पदमकुमारने जगाचा निरोप घेतला. यावरून हळहळ व्यक्त होत आहे.

एसडीपीओंची जीभ घसरलीघटनास्थळी एक युवक मोबाइलमध्ये शुटींग करत असल्याची बाब उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना खटकली. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग होत नसल्यामुळे त्यांनी त्याला शिवीगाळ केली. यावेळी त्यांची जीभ घरसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

टॅग्स :Suicideआत्महत्या