शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्ही मला माझ्यावर लिहिलेला धडा दाखविला, मी तुम्हाला बॅग देतो’! पत्नीसोबत मास्टर ब्लास्टर पोहचला शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2023 22:08 IST

Chandrapur News मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रांसोबत मुक्कामी ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे.

राजकुमार चुनारकर

चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रांसोबत मुक्कामी ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे, शुक्रवारी सचिन व परिवाराने कोलारा कोअर गेटमधून सफारी केली. तेव्हा त्यांना छोटी तारा वाघिण व दोन अस्वलांचे दर्शन झाले. दोन महिन्यांच्या अंतराने सचिनने ताडोबात दुसऱ्यांदा भेट दिली आहे.

सचिनने दोन महिन्यांपूर्वी अलिझंजा शाळेतील विद्यार्थ्यांना भेट दिली होती. तेव्हा विद्यार्थ्यांनी सचिनला त्यांच्यावर लिहिलेला धडा दाखविला होता. तेव्हा सचिनने मी तुम्हाला स्कूल बॅग देतो, असे सांगितले. दिलेले वचन पाळण्यासाठी सचिन पुन्हा शुक्रवारी अलिझंजा येथील शाळेत आला. तुम्ही मला भेटण्यासाठी रस्त्यावर आला होता. आता मी तुम्हाला स्कूल बॅग देण्यासाठी शाळेत आलो, असे सांगत या बॅगमध्ये काही साहित्य आहे, तुम्हाला खूप शिकायचे आहे, असा संदेश देत सचिनने शाळेतून निरोप घेतला.

सचिन तेंडुलकर फेब्रुवारी महिन्यात पत्नी अंजलीसोबत ताडोबात सफारीसाठी आला असता अलिझंजा बफर झोन गेटमधून सफारी करताना अचानक अलिझंजा जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. सचिनची पत्नी डॉ. अंजली यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याचे वचन दिले होते. ते सचिन व अंजलीने पूर्ण केले. यावेळी मुख्याध्यापक रमेश बदके, शिक्षिका मनीषा बावनकर, सरपंच गजानन वाकडे, शंकर चौखे, माजी सरपंच वैशाली नागोसे, देविदास बावनकर, रवींद्र उरकुडे, वनरक्षक परमेश्वर अनकाडे आदी उपस्थित होते. सचिन ७ मेपर्यंत रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पSachin Tendulkarसचिन तेंडुलकर