शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संकरीत गायीचेच दूध प्यावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी, अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या. दुग्धोत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातींचा वापर करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय होय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो.  मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात देशी गायींची संख्या कमी होत असून संकरित गायी पालनाचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे नागरिकांना संकरित गायीचेच दूध प्यावे लागणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी, अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या. दुग्धोत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातींचा वापर करावा लागला. यातूनच आता शेती व्यवसाय सहज जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुधाचा व्यवसाय सुरू झाले. पण,  देशी गायी कमी दूध देत असल्याने संकरित गायी पालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.  जि. प. पशूसंर्वधन विभागाने केंद्र व राज्य शासनाच्या दुग्ध विकास योजनांची अंमलबजावणी करीत आसल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.

ब्रह्मपुरीत म्हशींची संख्या अधिक

- ब्रह्मपुरी तालुका धान उत्पादनात अग्रेसर आहे. या तालुक्यात २० व्या पशुगणनेनुसार ८ हजार ९६५ म्हैस वर्गीय जनावरांची नोंद झाली. गायवर्गात २८ हजार ३४२ जनावरे आहेत. शासनाच्या योजनेमुळे शेतकरी आता दुग्ध उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून हा तालुका दूध उत्पादनातही प्रगती करत आहे.

सर्वांत जास्त पशुधन चिमूर तालुक्यातसर्वांत जास्त पशुधन चिमूर तालुक्यात आहे. पशुगणनेनुसार, ७२ हजार ७७५ पशुधनाची नाेंद करण्यात आली आहे. या तालुक्याला ताडोबाचे जंगल लागून आहे. शेतकरी शेतीला जोड म्हणून दुधाळू जनावरांचे पालन करत आहेत. वनकायद्यामुळे चराईच्या क्षेत्रात घट झाली, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सर्वांत कमी पशुधन बल्लारपूर तालुक्यातn बल्लारपूर तालुक्यात जंगलाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे; परंतु, अन्य तालुक्यांच्या तुलनेत पशुधनाची संख्या आहे.n जि. प. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, गायवर्ग, म्हैस, मेंढी, शेळी असा वर्गातील १९ हजार ५२७ जनावरांची नोंद झाली आहे.  n पोंभूर्णा तालुक्यात म्हैस वर्गीय जनावरांची संख्या कमी आहे. या शिवाय गोंडपिपरी, जिवती तालुक्यातही प्रमाण कमी आहे. 

 

टॅग्स :milkदूधcowगाय