शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात भरारी

By admin | Updated: May 29, 2015 01:43 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना यावर्षी बारावीच्या निकालात चांगलीच भरारी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक तालुक्याच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना यावर्षी बारावीच्या निकालात चांगलीच भरारी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक तालुक्याच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे यावर्षी महाविद्यालयात प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे. हिंदी सिटी कनिष्ठ महाविद्यालयचंद्रपूर : चांदा शिक्षण मंडळाद्वारे संचालित स्थानिक हिंदी सिटी कनिष्ठ महाविद्यालयाने ८२.७६ टक्के निकाल दिला आहे.नागपूर बोर्ड नागपूरद्वारा आयोजित एच.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी २०१५ मध्ये हिंदी माध्यम कला शाखेत जिल्ह्यात उत्कृष्ठ निकाल दिला असून महाविद्यालयातून एकूण ५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सदर निकाल ८२.७६ टक्के लागला आहे. अर्जून दिलीप शुक्ला याने ७८.६१ टक्के गुण प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला तर अंकिता अनिलकुमार यादव हिने ७५.३८ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला. नागभीडच्या विद्यालयांनी दिला उत्कृष्ट निकालनागभीड : बारावीच्या परीक्षेत येथील तिन्ही विद्यालयांनी निकालाची चांगली टक्केवारी दिली आहे. या निकालाने पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.येथे जनता विद्यालय, जनता कन्या विद्यालय आणि कर्मवीर विद्यालय असे तीन उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत यावर्षी या तिन्ही विद्यालयांनी निकालात चांगली भरारी घेतली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार येथील कर्मविर विद्यालयाने ९७.७१ टक्के निकाल दिला. या विद्यालयाचे १३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२८ विद्यार्थी पास झाले. येथील जनता कन्या विद्यालयाने ९७.१४ टक्के निकाल दिला. या विद्यालयातून १०५ विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी १०२ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर जनता विद्यालयाने ९३.६८ टक्के निकाल दिला. या विद्यालयाचे २८५ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.जनता कनिष्ठ महाविद्यालयचंद्रपूर : जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९ टक्के, वाणिज्य विभाग शाखेचा निकाल ९१.९७ टक्के व कला शाखेचा ९१.३४ टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेचा संभव ए. जैन हा विद्यार्थी ९२.३० टक्के गुण प्राप्त करून प्रथम आलेला आहे. व नितिन देवतळे हा विद्यार्थी ९१.२३ टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला आहे. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये अक्षता टाके, शुभम तितरे, सुखदा बोझावार, हरीश खोब्रागडे, मोसम उगेमुगे, सुरव भोयर, प्रिया कासोटे, साक्षी अग्रवाल, राधा पाचपोर, सिमरन कानकाटे, साक्षीकुमार अप्पा, सदाप मो. साजिद, गौरव साखरकर यांचा समावेश आहे.वाणिज्य शाखेचा रोहन राजेश दलिया हा विद्यार्थी ८९.२३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम आलेला आहे. तर द्वितीय प्रगती संतोष तरू ही विद्यार्थिनी ८४.४६ टक्के गुण घेऊन आलेली आहे. ८० टक्केहून अधिक गुण घेणाऱ्यामध्ये ०९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कला शाखेमधून निखिता विरेंद्र देशभारतकर ही विद्यार्थिनी ७६.७६ टक्के गुण घेऊन प्रथम आलेली आहे. व दर्शना गौतम साळवे व आकांक्षा निरसन रामटेके यांनी ७१.२३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेली आहे. विद्या निकेतन उर्जानगरचंद्रपूर : निकालामध्ये जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यात विद्यानिकेतन उर्जानगरच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षेत सुयश मिळविले. यावर्षी विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकाल देऊन शाळेचे नाव उंचाविले आहे.कुमार सुरज पोहेकरने प्रथम स्थान, कुमार राजहंस जुल्मे द्वितीय स्थान तर कुमारी मोनाली माहुलकर हिने तृतीय स्थापन प्राप्त केले. विषयानुसार प्राविण्य घेण्यात विद्यार्थी मागे राहिले नाही. मोनाली माहुलकर हिने इंग्रजी, हिंदी व जीवशास्त्र या विषयात प्राविण्य प्राप्त केले तर कुमार सुरज पोहेकर याने गणित व भौतिकशास्त्रात प्राविण्य प्राप्त केले. (लोकमत चमू)ब्रह्मपुरी तालुक्याचा निकाल ९०.२५ टक्केब्रह्मपुरी तालुक्याचा निकाल ९०.२५ टक्के लागला आहे. ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग ही विद्यार्थ्यांनी ९४.९२ टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. तालुक्यात २०९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार ८८८ उत्तीर्ण झाले आहेत. ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्युनिअर कॉलेजमधून विक्रम उमाजी हिरे याला ९१.२३ टक्के तर नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील नेहाल बी. भांबोरे याला ८९.२३ टक्के गुण प्राप्त झाले आहे. ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग ९४.९२ टक्के, दिपयान कुंतल विश्वास ९२.९२ टक्के तर अभिजीत विकास बनपूरकर याने ८९.२३ टक्के प्राप्त केले आहे. ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेज १०० टक्के, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ९२.७०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ८७.३६, लोकमान्य टिळक ९७.८७ टक्के, नेवजाबाई हितकारिणी बॉइज ९३.६५, कृषक कनिष्ठ महा. चौगान ९०.६६, ज्ञानोपासक ज्यु. कॉलेज निलज ९०.११, लोक ज्यु. कॉलेज गांगलवाडी ९०.९१, डॉ. पंजाबराव देशमुख ज्यु. कॉलेज ४९.०६, महाराष्ट्र ज्यु. कॉलेज पिंपळगाव ६९.७७, महात्मा फुले ज्यु. मेंडकी ९३.४४, कर्मविर कनिष्ठ मुडझा ९४.२०, कर्मवीर कन्नमवार सुरबोडी ८४.६२, विकास उच्च माध्य. विद्यालय अऱ्हेरनवरगाव ६५.७१, अनुदानित उच्च महाविद्यालय आश्रमशाळा ८९.१९ टक्के याप्रमाणे आहे. नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील एम.सी.व्ही.सी. शाखेचा निकाल ९१ टक्के आहे.तालुक्यात प्रथम येऊन नेहाने दिली गुरूदक्षिणाब्रह्मपुरी : शिक्षणाविषयी मनापासून आवड असली की शिक्षणाचे दारेही आपसुकच उघडतात. याचा प्रत्यय ब्रह्मपुरीत आला आहे. घरची हलाखीची परिस्थिती. शैक्षणिक साहित्य घेतानाही विचार यायचा. पैसे नसल्याने बारावी शिकता येईल की नाही, हाही प्रश्नच होता. अखेर शिक्षकांनीच मिळून तिच्या शिक्षणाचा भार उचलला. बुधवारी लागलेल्या बारावीच्या निकालात या मुलीनेही तालुक्यात प्रथम येत आपल्या गुरुजणांना गुरुदक्षिणा दिली. नेहा सुभाष सिंग असे या मुलीचे नाव असून ती ९४.९२ टक्के घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. नेहाचे वडील सुभाष सिंग गौरव पेपर मिलमध्ये मजुरीचे काम करतात. अल्पशा मजुरीवर कुटुंबाचे उदरनिर्वाह करून मुलीला चांगल्या ख्रिस्तानंद शाळेत टाकले. मात्र शिकविणे कठीण जात होते. मात्र नेहाची शिक्षणाविषयीची जिद्द व हुशारी कायम होती. आई गृहिणी आहे. जे मिळेल त्यावर समाधान मानून मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष देणे हेच आईचे कर्तव्य. जेव्हा नेहाने आर्थिक अडचण जाणवली, तेव्हा ख्रिस्तानंदच्या अ‍ॅलीस नामक शिक्षिकेने मदत करून धिर दिला. इतर शिक्षकांनीही परीक्षेचे शुल्क, साहित्य घेण्यास मदत केली. कुठलीही ट्युशन नाही. केवळ शाळेत शिकविल्या जाणाऱ्या तासामधून नेहाने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकविला.