शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

यंदा खरीप पिकांचे लागवड क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:07 IST

आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.

ठळक मुद्देनियोजन भवनात आढावा बैठक : जिल्ह्यात ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १० लाख ९१ हजार हेक्टर असून यातील ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. ४ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत आहे. ८९ हजार ४८७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची लागवड होते. उन्हाळ्यात २ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्या विविध पिके घेतली जातात. १ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सन २०१८- १९ च्या प्रत्यक्ष साध्य लक्ष्यांकाची माहिती सादर केली. भात, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन क्षेत्र आणि हेक्टरी उत्पादनासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक भोसले उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. जिल्ह्यात बियाण्याची उपलब्धता, बियाणांची मागणी आणि वाटपाची स्थिती कशी आहे, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. पीकविमा, कर्जवाटप, मृदा आरोग्य पत्रिका, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अशा विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक उषा डोंगरवार, कृषी शास्त्रज्ञ, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.महाबीजने उत्तम बियाणे पुरवावेकमी कालावधीत काढणीला येणाऱ्या व जास्त उत्पादन देणाºया भाताच्या वाणांची जागृती करणे, गुलाबी बोंड अळी रोखण्याच्या उद्देशाने कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांनी उशिरा लावावे. बियाणाचा पुरवठा उशिरा करू नये, बोंडअळी तीन वर्षे कोशातच राहत असल्याने कृषी विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहावे. शेतकºयांना मार्गदर्शन करावे. महाबीजने कमी कालावधीत येणाऱ्या भाताचे वाण उपलब्ध करून देणे, अशा सूचना विभागीय कृषी उपसंचालक भोसले यांनी अधिकाºयांना दिल्या.अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईकमी खर्च आणि अल्प कालावधीतील भात वाणांच्या मागणीत वाढ करावी, शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन करता यावे, याकरिता व्यवस्थापन कृतीकाळ दर्शवणारी मार्गदर्शिका कृषी विभागाने तयार करावे. कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच आयोजित केल्या जाणार आहे. या प्रशिक्षणाला गैरहजर असणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती