छतावरून पडून अभियंत्यांचा मृत्यू : आयुध निर्माणी परिसरातील खासगी कंपनीचा प्रतापविनायक येसेकर भद्रावतीयेथील आयुध निर्माणी परिसरात खाजगी कंपनीद्वारे बिल्डींग उभारल्याचे काम सुरु आहे. काम बघण्यासाठी छतावर चढलेल्या एका अभियंत्यांचा वरील प्लेट घसरल्याने खाली पडून मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर ‘लोकमत’ने कंपनीत जाऊन पाहणी केली असता कंपनीकडून कामगारांना कोणतीही सुरक्षा दिली जात नसल्याचे दिसून आले.सुनील कांत शेती (२९) रा. बल्लीकुंडा (ओडिशा) असे मृत अभियंत्याचे नाव असून तो गेल्या चार महिन्यापासून एस.एम. या कंपनीमध्ये अभियंता पदावर कार्यरत होता. आयुध निर्माणी परिसरात पिनाका टू या नवीन प्रोजेक्टचे काम जोमाने सुरु असून हे काम डीआरटीओ यांच्या नेतृत्वात हैद्राबाद येथील काही खाजगी कंपन्या काम करीत आहे. श्री बालाजी कंट्रक्शन या कंपनीचे बिल्डींग उभारण्याचे काम असून त्याची देखरेख ठेवण्याचे काम एस.एम. कटेसेन्स कंपनीकडे आहे. घटनेच्या दिवशी पिनाका प्रोजेक्टमधील एच टू या बिल्डींगचे काम चालू असताना सुनील कांत शेती हा काम पाहण्यासाठी ९ मीटरवरील स्लॅब टाकण्यासाठी तयार केलेल्या प्लेटच्या छतावर हेल्मेट, बेल्ट इतर सेफ्टी साहित्य परिधान न करता चढला. चालताना छतावरील प्लेट घसरल्याने तो खाली कोसळला. यात त्याचा मृृृृृत्यू झाला. या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने कंपनीत जाऊन चौकशी केली असता अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अभियंत्याचा जीव गेल्याची चर्चा होती. हे कामगार सुरक्षा व्यवस्थेविनाच काम करीत असल्याचेही दिसून आले.स्थानिक कामगारांना प्राधान्य नाहीआयुध निर्माणी परिसरात चालू असलेला पिनाका टू हा प्रोजेक्ट खूप मोठा असून यांच्या उभारणीचे काम डीआरडीओ यांनी हैदराबाद येथील दोन खाजगी कंपनीला दिली आहे. याच कामाकरिता मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाची गरज भासत असल्याने कंपनीने स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगार व अभियंत्याचा मोठ्या प्रमाणात भरणा केला आहे. येथील स्थानिकांना रोजगार दिल्यास त्यांना लागणारी सेफ्टी, वेतन व इतर सुविधा जास्त प्रमाणात द्याव्या लागणार, या हेतूने कंपनीने परप्रांतियांचा भरणा करुन कामचलाऊ पध्दतीने काम सुरू ठेवले आहे.कंपनीतील ही तिसरी घटनायेथील कामगार, अभियंता ज्या वेळेस कामावर, साईडवर जातात, त्या वेळी कामगारांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरविली जात नाही. यामुळे यापूर्वीसुद्धा दोन घटना घडून एका कामगाराचा पायाला गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या कामगाराच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र या कंपनीने घटनेची माहिती बाहेर येऊ दिली नाही. या घटनेमुळे जखमी कामगारांना कामापासून मुकावे लागले. या दोन घटना घडल्यानंतरही कंपनीने सुरक्षा व्यवस्थेबाबत काहीही केले नाही. त्यामुळे मंगळवारी अभियंत्याचा जीव गेला.
सुरक्षा व्यवस्थेविनाच राबताहेत कामगार
By admin | Updated: February 4, 2016 00:54 IST