एकसंघ बनून कामे करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:53 PM2017-08-16T23:53:52+5:302017-08-16T23:54:12+5:30

अगदी विधीमंडळातील सभागृहाप्रमाणे अद्ययावत नियोजन भवन चंद्रपूरच्या लोकप्रशासनाला पयार्याने जिल्ह्याला लोकार्पित करतांना मला आनंद होत आहे.

 Work together and work together | एकसंघ बनून कामे करावी

एकसंघ बनून कामे करावी

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : नियोजन भवनाचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अगदी विधीमंडळातील सभागृहाप्रमाणे अद्ययावत नियोजन भवन चंद्रपूरच्या लोकप्रशासनाला पयार्याने जिल्ह्याला लोकार्पित करतांना मला आनंद होत आहे. मात्र या नव्या नियोजन भवनातून जिल्ह्यातील तळागाळाच्या सामान्यातील सामान्य माणसाच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होणारे नियोजन घडले पाहिजे. त्यासाठी एक संघ चमू बनून मिशन मोडवर काम करा, असा संदेश वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिला.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्रातील सर्वात देखणी व आकर्षक अशी नियोजन भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी मंडळातील सभागृहासारखी बैठक व्यवस्था, ध्वनीव्यवस्था आणि इलेक्ट्रॉनिक्स डिस्प्ले यंत्रणा येथे उभारण्यात आली आहे. मंगळवारी एका दिमाखदार सोहळयात हे सभागृह लोकार्पित करण्यात आले. तत्पूर्वी या नव्या इमारतीच्या दर्शनी फलकाचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
या इमारतीतील अद्ययावत सभागृहामध्ये यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयांशी संवाद साधला. ते म्हणाले जिल्ह्याच्या विकासामध्ये जिल्हा नियोजन समितीचे स्थान महत्वपूर्ण असते. दूरदृष्टीच्या नेतृत्वाने व अधिकाºयांनी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्याचा उत्कर्ष लक्षात घेऊन नियोजन तयार करण्याचे गरजेचे असते. जिल्हा सद्या विविध योजनांच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करत आहे. अशावेळी महाराष्ट्रातील सर्वात उत्तम जिल्ह्याचे नियोजन या भवनातून झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
३०३ लोकांच्या बसण्याची आसन क्षमता असणाºया या सभागृहातून नवीन योजना महाराष्ट्राला मिळाल्या पाहिजे. हल्ली महाराष्ट्राच्या अनेक योजना केंद्र शासन स्विकारत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या योजनाही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याने स्विकारल्या पाहिजे. आपले जिल्हा प्रशासनात अभिनव प्रयोग सुरु आहे. हॅलो चांदा साठी अनेक लोकांचे मला फोन येतात. काम तातडीने झाल्याचे समाधान त्यांच्या प्रतिसादातून मिळत आहे. देशातील हा पहिला प्रयोग आहे. यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन मात्र आता हीच परंपरा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत पुढे न्यायची आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात फिरती जिल्हा परिषद हा महाराष्ट्रात पहिला प्रयोग चंद्रपूरमध्ये होत आहे. शेवटच्या टोकावरच्या माणसाला आपल्यासाठी प्रशासन धावून येते. याची जाणीव झाली पाहिजे. त्यांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वच विभागाने आपल्या अभिनव कल्पना राबविल्या पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी हॅलो चांदा संदर्भात काढण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्र्यासह आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, सभापती राहूल पावडे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ अभियंता महिमा डोंगरे यांनी तर उपस्थिताचे आभार उपअभियंता मनोज जुनोनकर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title:  Work together and work together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.