शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलच्या रिक्त पदांमुळे कोरपन्यातील कामाचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:15 IST

७३ पैकी केवळ ५४ पदेच भरली : काम करताना कर्मचाऱ्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : तेलंगणा राज्य सीमेवर दुर्गम, आदिवासीबहुल क्षेत्रात १९९२ मध्ये कोरपना तहसील अस्तित्वात आली. या भागात महसूल विभागाची ७३ पदे मंजूर असून, भरलेली पदे अवधी ५४ आहेत. मात्र, तहसील कार्यालयात प्रमुख पद असलेल्या तहसीलदाराचीच जागा २७ सप्टेंबर २०२३ पासून रिक्त असून, राजुरा येथील तहसीलदार यांच्याकडे कोरपनाच्या कार्यालयाचा प्रभार आहे. 

या ठिकाणी विविध उद्योग व वेकोली, रेती घाट, मोठ्या प्रमाणात असल्याने कामाचा व्याप आहे. अधिक महसूल देणारा म्हणून या तालुक्याची ओळख आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार या दोन जागा रिक्त आहेत तर महसूल सहायक ३ जागा रिक्त आहेत. वर्ग ३च्या महसूल सहायकांची निवडणूक विभागात १ जागा रिक्त आहे. 'रोहयो' अंतर्गत वर्ग ३ची पुरवठा निरीक्षक १ जागा, गोदाम सहायक १ जागा, गोदाम लिपिक १३ जागा, वर्ग ४च्या ३ जागा रिक्त आहेत. 

तलाठीच्या २ जागा तर कोतवाल ५ जागा रिक्त असल्यामुळे एकाच विभागातील टेबलवर २ ते ३ विभागाचे काम असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. या भागात वर्ग रच्या जमिनी वर्ग १ करण्यामध्ये नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्यामुळे अर्धे अधिक टेबल खाली असून नागरिकांना कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागत आहेत. कोरपना येथील महसूल विभागाच्या रिक्त जागा तातडीने देण्यात यावे, अशी मागणी सय्यद आबिद अली यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. 

विविध शासकीय कार्यालयातही पदे रिक्त कोरपना येथे तहसील कार्यालयासह पंचायत समिती, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग, दुय्यम निबंधक, उपकोषागार अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगरपंचायत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वीज उपकेंद्र आदी कार्यालय आहे. परंतु या सर्व कार्यालयात अनेक पदे रिक्त आहे. यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम जाणवतो आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर