शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम निधीअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे.

ठळक मुद्देमंजुरीला चार वर्षे पूर्ण : चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांची रेल्वे फाटकावर ताटकळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या रहदारीसाठी बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम विहित कालावधीत पूर्ण करणे गरजेचे होते. बांधकामाला चार वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली. मात्र, निधीअभावी बांधकाम रखडल्याने दररोज शेकडो नागरिकांना रेल्वे फाटकावर ताटकळ राहावे लागत आहे.शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे. २०१६ रोजी या पुलाला ३२.२२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. राज्य शासन, रेल्वे आणि महानगर पालिका मिळून ३३.२२ कोटी रुपयांच्या खर्चाची विभागणी करण्यात आली. बांधकाम सुरु झाले. मात्र, पुलाच्या बांधकामात ९३ पक्की बांधकामे आडवी आली. परिणामी, पुनर्वसनाच्या प्रश्नावरून नागरिकांनी लढा उभारला. काही जण न्यायालयात गेले. त्यामुळे पुलाचे बांधकामाला विलंब होत आहे.१० कोटी २६ कोटींची गरजबाबूपेठ उड्डाणपूल बांधकामासाठी राज्य राज्याकडून १० कोटी २६ लाख आणि मनपाचे पाच कोटी असे एकूण १० कोटी २६ लाखांचा निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे बांधकाम थंडावले आहे. या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली. परंतु राज्य शासनाने निधी दिला नाही. कोरोनामुळे बांधकामावर ३० टक्के निखी खर्च करण्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने जारी केले. त्यामुळे या उड्डाण पुलासाठी निधी मिळणार की नाही, हा प्रश्नच आहे. पुलाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. या प्रश्नावरून राजकारणही झाल्याचा इतिहास आहे.

टॅग्स :railwayरेल्वे