शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वंडरबॉय! अफाट स्मरणशक्तीचा कैवल्य अमोल भोयर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 12:53 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा या गावातील कैवल्य अमोल भोयर याला देशातील राज्यातील प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय खेळ, फुल, प्राणी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी तोंडपाठ आहेत.

ठळक मुद्देवय तीन वर्षांचे, स्मरणशक्ती मोठ्या माणसाचीचक्क ५ लाख लोकांनी दिली व्हिडिओला पसंती  

सतीश जमदाडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तीन वर्षांचे वय हे खेळण्या-बागडण्याचे असते मात्र

लहान वयातच काही मुलांमध्ये असामान्य बुद्धिमत्तेची चुणूक दिसून येते. त्याची हुशारी भल्याभल्यांना थक्क करून सोडते. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा या गावात राहणाऱ्या कैवल्य अमोल भोयर या तीन वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या सामान्य ज्ञान आणि स्मरणशक्तीच्या जोरावर भल्याभल्यांना आश्चर्यचकित करून सर्वांच्या भुवया उंच करावयास भाग पाडले आहे.जी वय मुलांची खेळायची असते अशा वयात कैवल्यची जनरल नॉलेजसोबत मैत्री आहे. कैवल्यला दररोज घडणाºया घटनांची व नवनवीन माहिती जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्याचे आई-वडील देखील त्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. कैवल्यचे वडील हे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत, तसेच त्यांचा मोबाईल दुरुस्तीचे काम देखील आहे,व कैवल्यची आई वैशाली अमोल भोयर ह्या नांदा या गावच्या पोलीस पाटील आहेत. आई वडील या दोघांचाही दिनक्रम अतिशय व्यस्त असतांना देखील कैवल्यला वेळात वेळ काढून संपूर्ण जनरल नॉलेज सोबत घडणाºया रोजच्या नवीन घटनाची माहिती त्याला देत असतात. यात त्याला चित्राच्या माध्यमातून देखील ओळख करून दिली जाते. ज्यात त्याला माहिती जाणून घेण्यास मदत होते. सध्या कैवल्य शाळेत जात नसला तरी देखील तो लवकर प्रत्येक गोष्ट आत्मसाद करतो येणाऱ्या अभ्यास वर्षात त्याचा चांगल्या शाळेत प्रवेश देणार असल्याचे त्याच्या वडीलाने सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण सोशल मिडीयावर कैवल्याचा विडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. युटूबर नादखुळा या चॅनेलने कैवल्याच्या हा व्हिडीओ अपलोड केला असता त्याला ४ लाख ७२ हजार लोकांनी बघितले असून हजारो लाईक सोबत प्रशंसनीय कमेंट्ससुद्धा आहेत.यात त्याने तीन मिनिटात जवळजवळ ७५ प्रश्नांना न अडखळता उत्तरे दिली आहेत.केवल्य दीड पावणेदोन वर्षांचा असतानाची गोष्ट आहे. तो नुकताच बोलायला लागला होता. त्याची आई स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होती. त्यावेळी तो शेजारी बसला असताना त्याला काही प्रश्न व त्याची उत्तरे सहजच सांगितली. ज्यात आपला जिल्हा, राज्य आदी माहिती होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा अभ्यासाला त्याची आई बसली असताना कैवल्यने आदल्या दिवशी सांगितलेली माहिती बिनचूकपणे आईला पुन्हा सांगितली. तेव्हा आम्हाला आश्चर्यच वाटले. त्याला मग दररोज नवनवी माहिती देत गेलो. त्यानेही ती तात्काळ आत्मसात केली. त्याला स्मरणशक्तीचे वरदान असल्याचे तेव्हाच आमच्या लक्षात आले. आम्ही त्याला टीव्ही जास्त पाहू देत नाही. काही महत्त्वाचे व माहितीपूर्ण कार्यक्रमच पाहू देतो.वैशाली व अमोल भोयर (कैवल्यचे आईवडील)  

टॅग्स :Healthआरोग्य