शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महिलांनी घेतला कुपोषणमुक्तीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:22 AM

तालुक्यातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हुडकी येथे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देविशेष समितीचे गठन : सहा बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यात यश

आॅनलाईन लोकमतवरोरा : तालुक्यातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हुडकी येथे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब हेरुन येथील सरपंच सुशीला तेलमोरे यांनी गाव कुपोषणमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. त्याअनुषंगाने गावातील काही महिलांची समिती स्थापन करून कुपोषणमुक्तीसाठी विशेष प्रयत्न सुरु केले असून आतापर्यंत सहा बालकांना कुपोषणमुक्त करण्यात त्यांना यश आले आहे.शासनाने कुपोषण मुक्ती करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहेत. मात्र त्याबाबत योग्य त्या प्रमाणात जनजागृती होत नसल्यामुळे ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. वरोरा तालुक्यातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत हुडकी येथील आंगनवाड़ी केंद्रातील कुपोषणाचे प्रमाण बघून सरपंच सुशीला तेलमोरे यांनी कुपोषण समूळ नष्ट करण्याच्या हेतूने येथील महिलांच्या आधारे एका समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच सुशिला तेलमोरे, तर सदस्य म्हणून पं.स.सदस्य संजीवनी भोयर, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, शीतल पारेकर, वाळके, म्हैसमार, रेखा आसुटकर, अनिता ढवस, मंगला शेटे, सरला मालेकर, मनीषा सावसागडे, अर्चना वाटकर, बावणे आदींचा समावेश आहे. या महिलांच्या समितीच्या आधारे विशेष उपक्रम राबविणयात येतात. त्यामध्ये या समितीकडून दर आठवड्यात बालकांना ड्रायफुट, पोषक आहार देण्यात येतो. दर आठवड्यात बालकांचे वजन तपासले जाते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. या उपक्रामतून या पथकाने परिसरातील सहा बालकांना कुपोषण मुक्त करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत या महिलांना शासनाची कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही.