शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बांबूपासून महिलांनी तयार केली ज्वेलरी, बांबू ज्वेलरी प्रशिक्षणातून महिलांना मिळाले उपजिवीकेचे साधन

By राजेश भोजेकर | Updated: March 9, 2024 16:24 IST

आठ दिवसीय ज्वेलरी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी महिलांनी बांबू पासून ज्वेलरी तयार करून आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण केले.

चंद्रपूर :  झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे, या उद्देशाने चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात (बीआरटीसी) आठ दिवसीय ज्वेलरी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी महिलांनी बांबू पासून ज्वेलरी तयार करून आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण केले.

ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच करण्यात आला. 20 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. बाजारपेठेत असलेल्या विविध धातूच्या ज्वेलरी आपल्याला नेहमीच दिसतात, परंतु  बांबू वस्तुंची  वाढती मागणी लक्षात घेता या प्रशिक्षणात महिलांना विविध प्रकारची बांबू ज्वेलरी तयार करण्याचा लाभ आवश्यक साधनसामुग्री सह देण्यात आला. प्रशिक्षणाकरिता संपूर्णा बांबू केंद्र मेळघाट येथून विजय काकडे, कृष्णा मासादे या प्रशिक्षकांना बोलविण्यात आले होते. या प्रसंगी महिलांनी प्रशिक्षणातून विविध डिझाईन मध्ये बांबूपासून ज्वेलरी तयार केली.  यावेळी जिल्ह्यातील विविध बांबू वस्तू उत्पादक व खरेदीदार यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून महिलांनी तयार केलेल्या ज्वेलरीचे कौतुक केले आणि खरेदीसुध्दा केले. अश्या प्रशिक्षणातून ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास  केंद्राचे संचालक अशोक खडसे  यांनी व्यक्त केला. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. सुभाष गिरडे,  बीआरटीसी चे पर्यवेक्षक  योगिता साठवणे, वनपाल एस. एस. लाटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षण