गुन्हा दाखल झाल्याने महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST2021-06-18T04:20:26+5:302021-06-18T04:20:26+5:30

भगवनिया गोवर्धन शेवडय्या (५५) असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मृतक महिलेचे दीर धरमसिंग शेवडय्या यांनी ...

Woman commits suicide due to crime | गुन्हा दाखल झाल्याने महिलेची आत्महत्या

गुन्हा दाखल झाल्याने महिलेची आत्महत्या

भगवनिया गोवर्धन शेवडय्या (५५) असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मृतक महिलेचे दीर धरमसिंग शेवडय्या यांनी माजरी पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वेकोली प्रशासनाकडून परिसरातील वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, वेकोलीने करवाई करीत ६ एप्रिल रोजी येथील काही नागरिकांविरूद्ध माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये मृतक भगवनिया गोवर्धन शेवडय्या हिचेसुद्धा नाव होते. वेकोलीने या महिलेच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊन खोट्या गुह्यात अडकविले, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. यातूनच तिने आत्महत्या केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार बंडू मोहुर्ले करीत आहेत.

Web Title: Woman commits suicide due to crime