शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवस होऊनही मृत तरुणीची ओळख पटली नाही; मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 11:50 IST

हे हत्या प्रकरण आता पोलिसांसाठी मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. हा नरबळीचा प्रकार आहे का, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन हाच तपासाचा एकमेव पर्याय

भद्रावती (चंद्रपूर) : निर्वस्त्र तरुणीचे धडापासून शीर वेगळे करून तिची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाला पाच दिवस लोटूनही शीर गवसले नाही. आरोपी गवसले नाहीत हे तर सोडाच; पण मृत तरुणीची ओळखही पोलीस विभाग सांगू शकला नाही. त्यामुळे हे हत्या प्रकरण आता पोलिसांसाठी मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.

दरम्यान, या तरुणीचे धडच घटनास्थळावर आढळल्याने तपासाला गती देणारा ठोस पुरावा गवसला नसल्याने आता पोलीस घटनेच्या दिवशी मोबाईल लोकेशन तसेच शहरातील विविध भागांचे मोबाईल लोकेशन यांवर तपास चक्रे फिरवीत असल्याचे ठाणेदार गोपाल भारती यांनी सांगितले.

पोलिसांनी घेतल्या विविध संघटनांच्या बैठका

तरुणीचे हत्या प्रकरण चिघळत असल्याने त्या किंवा इतर दिवशी अनोळखी व्यक्ती या परिसरात आढळली का, तसेच बाहेरील कोणी व्यक्ती आपल्या शेजारी राहत आहे का, एखादी तरुणी बेपत्ता आहे का, अशा विविध शोधमोहिमांसाठी भद्रावती पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील संघटना, अंगणवाडी सेविका, शहरातील विविध बँक, हॉटेल व्यावसायिक तसेच शहरातील इतर व्यावसायिकांच्या संयुक्त बैठका घेऊन तपासाला आधार देण्याचे काम पोलिसांमार्फत सुरू आहे.

अत्याचार झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज

पुरावे नष्ट करण्यासाठी शिर कापून धड घटनास्थळी फेकले. त्यामुळे या तरुणीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते; परंतु पीएम अहवालाबाबत ठाणेदार गोपाल भारती यांच्याशी संपर्क साधला असता आतापर्यंत पीएम अहवाल माझ्यापर्यंत पोहोचला नाही. मात्र त्या तरुणीवर अत्याचार झाला नाही. हा वैद्यकीय प्राथमिक अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले. अत्याचार करून हत्या करण्यात आली नाही तर हा नरबळीचा प्रकार आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिस