शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा जगण्यासाठी केविलवाणा संघर्ष

By admin | Updated: December 6, 2014 01:24 IST

दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला.

प्रकाश काळे गोवरीमै उगाता हू कपासतो सारी दुनिया कपडे पहनती हैफिर भी मेरी ही लाश क्यूएक कफन के लिए तरसती है ?कवितेच्या या ओळी शेतकऱ्यांची व्यथाच नाही तर त्यांच्या जिवनाची दु:खदायक कहानी मांडायला पुरेशा आहेत. दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला. मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतमालाच्या दरवाढीकडे पाठ फिरविल्याने उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी कमी पावसात कशीबशी शेती पिकविली. शेतीवर जुळवाजुळव करुन खर्च केला. मात्र झालेला खर्च निघणार किंवा नाही, याची कोणतीच हमी शेतकऱ्यांजवळ नाही. दिवसरात्रं कष्ट उपसूनही निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारेही कोणी पुढे येत नाही. ‘कृषीप्रधान देशातील उत्तम शेती’ अशी ब्रिदवाक्येही आता काळाच्या ओघात केव्हाच मागे पडली आहेत. शेतकऱ्यांनी अनेक पावसाळे पाहिले. तेव्हा निसर्ग शेतकऱ्यांना लेकराप्रमाणे जवळ करायचा. मात्र कष्टकरी बापालाही निसर्गाने दगा दिल्याने शेतीवर अतोनात खर्च करुन उत्पन्न मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज फेडून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना दिवस-रात्रं छळत आहे. यंदा निसर्गाच्या संकटाशी सामना करीत शेतकऱ्यांनी कसेबसे शेतात पीक उभे केले. विदर्भाची सुपिक माती आणि त्या मातीत उगविणारे मोती शेतकऱ्यांना त्यांची बाजू भक्कम करणारे ठरतात. मात्र निसर्गाची अवस्था व सरकारी धोरण यामुळे शेतीला अवकळा आली आहे. परिणामी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी, नापिकी, निसर्गाचा लहरीपणा यात शेतकरी भरडला जात असताना शेतमालाला दर कमी आणि उत्पादन खर्च अधिक होत असल्यामुळे ‘शंभराचे साठ अन् गळ्याला फास’ अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा किती काळ अंत पाहायचा, असा प्रश्न काळजाला पिळ पाडणारा आहे. निवडणुकांच्या काळात मतांचा जोगवा मागणारे राजकीय पुढारी आता शेतकऱ्यांविषयी बोलायला तयार नाहीत. मग ते खरोखरच शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतील काय? अशी शंकाही आता घेतली जात आहे. केवळ आश्वासनाची खैरात आणि आमिषं दाखवून जनतेला कशी भूल पडेल याचा विचार सत्ताधारी करतात. मात्र जगाचा पोशिंदा गळ्याला फास आवळतोय त्याचे काय? दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याने पिकविलेली हक्काची चतकोर भाकर खाता येत नाही. हा कुठला न्याय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. परंतु शासनाने अद्यापही कापसाला हमी भाव जाहीर केला नाही. एवढेच नव्हे तर शासकीय खरेदीही सुरू झाली नाही.