शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. शाळा बंद होणार का ? शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:01 IST

Chandrapur : आधार व्हॅलिड नसल्याने बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार व्हॅलिडच्या संख्येनुसार होत आहे. राज्य शासनाच्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीनवीन संचमान्यतेचे धोरण अवलंबण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर आहे. पटसंख्येअभावी शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती सतावत आहे. जिल्ह्यात ११ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करून घ्यायचे होते. मात्र, आधार व्हॅलिड आणि पटसंख्येत तफावत असून पटसंख्या कमी झाली आहे.

नव्या संचमान्यतेनुसार इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत एकूण २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळेवर शून्य शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याचे सांगितले जाते. नव्या धोरणामुळे शिक्षक अतिरिक्त होणार असून, शाळांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांत अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.

जिल्हा परिषद शाळांवर हे संकट का आले?नवीन संचमान्यता धोरण, खासगी शाळांचे बाढ़ते आकर्षण, पटसंख्येतील घट आदी बदलांमुळे जिल्हा परिषद शाळांमसोर संकट उभे झाले आहे.

संचमान्यतेचे धोरण काय?

  • संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार ७८ विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक असतील. यामुळे ज्या शाळांमध्ये ६ वी ते ८ वीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नाहीत.
  • १५० पेक्षा कमी विद्यार्थी 3 असतील तर तेथे मुख्याध्यापकाचे पदही राहाणार नाही. या नव्या संचमान्येचे शिक्षकांकडून विरोध होत आहे.

१५४२ शाळा चंद्रपूर जिल्ह्यात

  • जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक १ हजार ५४२ शाळा आहेत.
  • या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पाच हजारांवर शिक्षक या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

"जिल्ह्यातील प्राथमिक शाळेकडून आलेल्या जवळपास ३०९ शाळेच्या संचमान्यतेत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत."- अश्विनी सोनवाणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, चंद्रपूर

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षणchandrapur-acचंद्रपूर