शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानात जाणारा प्रत्येकच वाईन घेणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

सरकारने मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला. दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून, दारूचे नवीन दर जाहीर केले होते. किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावरून मतेमतांतरे उमटत आहेत. जिल्ह्यात भाजपने राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करून विरोध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री केली जाणार आहे. त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठे असावे, ही अट आहे. यासाठी एक शोकेस बनवून वाइन विक्री करता येणार आहे, परंतु सरसकट सर्व किराणा दुकानातून दारू मिळणार, असा अर्थ काढून काही मंडळी विरोध करीत आहेत. किराणा वस्तू घेण्यासाठी जाणारा प्रत्येक व्यक्ती वाइनच विकत घेतो, हे म्हणणे अर्थसत्य असल्याचे मत किराणा दुकानदारांनी व्यक्त केले.सरकारने मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला. दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून, दारूचे नवीन दर जाहीर केले होते. किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावरून मतेमतांतरे उमटत आहेत. जिल्ह्यात भाजपने राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करून विरोध केला. याबाबत चंद्रपूर, बल्लारपूर, दुर्गापूर व बंगाली कॅम्प, भद्रावती येथील किराणा दुकानदारांची मते जाणून घेतली. भाजपने गोवा, हिमाचल प्रदेश राज्यात हे धोरण आधीच लागू आहे. मात्र, महाराष्ट्रात विरोध होत असल्याने बाबूपेठातील एका किराणा दुकानदाराने आश्चर्य व्यक्त केले.

अटींची प्रतीक्षा करायला हवी

- सरकारने निर्णय घेतला, परंतु नेमक्या अटी जाहीर केल्या नाही. सध्या जी माहिती पुढे आली त्यापेक्षा वेगळीही असू शकते.  हा विषय शेती व शेतकऱ्यांशीही संबंधित आहे. - अटींची प्रतीक्षा करावी हवी, असे मत दुर्गापुरातील कमलेश नावाच्या दुकानदाराने व्यक्त केले. सध्या तरी काही सांगता येणार नाही, असे म्हटले.

गैरवापरही होऊ शकतो वाइन विक्रीचा परवाना मिळालेल्या किराणा दुकानातून दारू विक्रीची शक्यताही आहे. यातून अवैध व्यवसाय फोफावतील किराणा दुकानदार बदनाम होतील, अशी भिती काहींनी व्यक्त केली.

किराणा दुकानदार म्हणतात...

किराणा दुकानात मी अंडी विकतो. शुद्ध शाकाहारी अनेक ग्राहक दुकानात येतात, परंतु ते अंडीच घेतात, असे नाही. ग्राहकांना जे आवश्यक आहे, त्या वस्तू विकत घेतील. - शंकर लेनगुरे, किराणा दुकानदार.

एक हजार चौरस फुटांच्या जागेतील किराणा दुकानात वाइन विक्री होईल. माझे किराणा दुकान लहान आहे, अटीत बसत नाही. सुपर मार्केट शहर व तालुकास्थळी असतात. तिथला ग्राहक श्रीमंत असतो.  -विवेक रामपल्लीवार, किराणा दुकानदार. 

टॅग्स :liquor banदारूबंदी