शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीसाठी रुग्णांचा भरवसा खासगीपेक्षा शासकीय रुग्णालयावर का वाढला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:24 IST

Chandrapur : शासकीयमध्ये नैसर्गिक प्रसूती तर खासगीत सिझेरियनवर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वैद्यकीय क्षेत्रात रोज नव्याने बदल होत आहेत. या अत्याधुनिक बदलाच्या जोरावर शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये चांगली सेवा मिळते, अशी अनेकांची धारणा झाली आहे. हे खरे असले, तरी खासगी रुग्णालयाच्या तुलनेत आजही शासकीय रुग्णालयात नैसर्गिक प्रसूती आणि ती देखील अगदी मोफत केली जाते.

आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक ती साधनसामुग्री, तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह मडिकल कॉलेज, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीची सोय उपलब्ध आहे. याठिकाणी मातेची नैसर्गिक प्रसूती व्हावी, यावर भर देण्यात येतो.

प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास सिझेरियनचा निर्णय घेण्यात येतो. खासगी रुग्णालयात सिझेरियनसाठी येणारा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. विशेष म्हणजे, रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्यांपैकी अनेक गर्भवती महिला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील काही वर्षामध्ये झालेल्या आरोग्यविषयक सुविधांमुळे शासकीय रुग्णालयाकडे अधिक रुग्ण जात आहे. 

खासगीतून शासकीयमध्ये जाण्याची कारणेखासगी रुग्णालयातील सिझेरियनचा खर्चाला मापदंड नसतो. या रुग्णालयातील खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसेल, तर ते शासकीय रुग्णालय गाठतात. त्या ठिकाणी मोफत प्रसूती करण्यात येते. 

शासकीय रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीवर भरशासकीय रुग्णालयामध्ये नेहमीच नैसर्गिक प्रसूती करण्यावर सर्वाधिक भर दिला जात असल्याचे आकडेवारीवरून समोर येते.

गुंतागुंतीची प्रसूती असल्यास खासगीत धावस्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलांची काळजी घेणे, त्यांना धीर देणे आणि नैसर्गिक प्रसूती कशी होईल, यासाठी सर्व स्टाफ आपले कौशल्य पणाला लावत असतो. त्यामुळे अनेकवेळा गुंतागुंतीची वाटणारी प्रसूती देखील नैसर्गिक पद्धतीने केली जाते. खूपच गुंतागुंतीची प्रसूती असेल तेव्हाच त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला देतो. 

शासकीय रुग्णालयातून खासगीत जाण्याची कारणेएखाद्या गरोदर मातेची प्रसूती होण्यास वेळ लागतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टर असताना महिलेच्या नातेवाइकांकडून अतिरिक्त काळजीपोटी शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात नेले जाते.

रुग्णांकडून घेण्यात येते सेवेनुसार चार्जेसखासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी वेगवेगळे चार्जेस असतात, परंतु त्या बदल्यात सेवा देखील तशीच दिली जाते. तिथे एसी, डिलक्स रूम असतात. तुम्ही कशी सेवा घेता त्यावर चार्जेस अवलंबून असतात.

रिस्क नको म्हणून सिझेरिनजिल्ह्यातील सिझेरियन प्रसूतीचे शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयामध्ये अधिक आहे. सुखरूप प्रसूती करण्यासाठी आणि रिक्स नको म्हणून खासगी रुग्णालातील डॉक्टर सिझेरिन करण्यावर भर देतात.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर