लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यात मूल तालुक्यात असलेल्या चिरोली येथे प्राचीन शिवमंदिराकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने ते मोडकळीस आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याला मंदिरांची प्राचीन परंपरा लाभली आहे. मार्कंडा येथेही हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. त्याच्या जीर्णोद्धाराचे काम मोठ्या जोरात सुरू आहे. चंद्रपूर शहरातही महाकालीसह काही मंदिरे आहेत. येथे जुने वाडे, किल्ले, मंदिरे यांची रेलचेल आढळते.अशातच चिरोली येथे असलेले प्राचीन शिवमंदिर डागडुजीच्या प्रतिक्षेत आहे. हे मंदिर लवकरात लवकर सुस्थितीत यावे अशी येथील भक्तांची मागणी आहे.
या प्राचीन मंदिराकडे कोण लक्ष देणार?; चंद्रपूर जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 11:13 IST