शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

अमलनाला धरण परिसरात 15 मृत जनावरे फेकणारे कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने ही जनावरे परिसरातच फेकून तस्करांनी पाेबारा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसराची व्याप्ती मोठी आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  दरम्यान, परिसराची पाहणी केली असता अमलनाला धरण प्रकल्प परिसरातील एका खोलगट भागात  तब्बल १५ मृत जनावरे फेकून दिल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात सोमवारी एकाच ठिकाणी तब्बल १५ मृत जनावरे आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, महसूल व पोलीस प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही महिन्यांपासून गोवंश तस्करांच्या आंतरराज्य टोळीने नव्या मार्गाचा वापर सुरू केला. वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने ही जनावरे परिसरातच फेकून तस्करांनी पाेबारा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसराची व्याप्ती मोठी आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  दरम्यान, परिसराची पाहणी केली असता अमलनाला धरण प्रकल्प परिसरातील एका खोलगट भागात  तब्बल १५ मृत जनावरे फेकून दिल्याचे दिसून आले. गावातील जनावरांचा अपघाती अथवा नैसर्गिक जनावरांचा मृत्यू झाला तरी अशी अवहेलना कुणीही करीत नाही. जनावरांच्या मृतदेहाची मानवी वस्तीपासून दूर व योग्यरीत्या विल्हेवाट लावली जाते. पण एकाच ठिकाणी १५ मृत जनावरे आढळल्याने विविध शंकांना पेव फुटले. जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. धरणाच्या परिसरात मृतदेह फेकणारे काेण, यासारखे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.

गडचांदूरच्या पाणीपुरवठ्याचे काय?  लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. अशावेळी ती मृत जनावरे नाल्यातील पाण्याने वाहून धरणात जाऊ शकतात. अमलनाला प्रकल्पातून गडचांदूर व नांदा पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अशा स्थितीत धरण परिसरात मृत जनावरे टाकणे बंद झाले नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

नागरिक म्हणतात...चौकशी करून कारवाई कराn अमलनाला धरण परिसरात एवढ्या मोठ्या संख्येने मृत जनावरे आढळल्यानंतरही पोलीस, महसूल व पशुसंवर्धन विभागाला काहीही माहिती नाही. त्या जनावरांचा पंचनामा का झाला नाही, असाही प्रश्न पुढे आला. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

यापूर्वी इसापूर ग्रामपंचायत हद्दीत टाकली मृत जनावरे

काही महिन्यांपूर्वी इसापूर ग्रामपंचायत हद्दीत मृत जनावरे टाकण्यात आली होती. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी गो-तस्करांना प्रखर विरोध केला. परिणामी, मृत जनावरे बैलमपूर शिवारात टाकणे सुरू झाले. आता अगदी गडचांदूर शहराला लागूनच असलेल्या अमलनाला धरण परिसरात मृत जनावरे टाकल्याने तस्करांवर कुणाचा वरदहस्त आहे की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. 

 

टॅग्स :amalnala Damअमलनाला धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प