शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत जोडो यात्रा’ जिथे गेली तिथे काँग्रेस फुटली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:06 IST

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

चंद्रपूर : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या राज्यांमध्ये गेली तिथे काँग्रेस फुटली. नेत्यांनी काँग्रेसला सोडले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी चंद्रपुरात केले.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींना दिलेल्या मतासारखे राहणार आहे. 

विकासावर लढतोय : मुनगंटीवार माझ्यासाठी साऱ्या जाती समान आहेत. ही निवडणूक जनतेची आहे. माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध नाही तर विकासासाठी आहे. जात किंवा सहानुभूतीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढतोय, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला. मुनगंटीवार यांनी  मंगळवारी मिरवणुकीतून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले नामनिर्देशन दाखल केले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत मुनगंटीवार बोलत होते. 

काँग्रेसच्या प्रतिभा धानाेरकरांचेही नामांकनचंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनीही मंगळवारी नामांकन अर्ज दाखल केला.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्याने माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना रविवारी रात्री उशिरा काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली होती.धानोरकर यांच्या समर्थनार्थ चंद्रपुरात बुधवारी महारॅली काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४