शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

दारूबंदी उठविल्याची राज्य सरकारची अधिसूचना अडकली तरी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

दारूबंदीमुळे अडीच हजारांहून अधिक कोटींचा महसूल बुडून जिल्ह्याच्या एकूणच विकासावर मोठा दुष्परिणाम झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. त्यामुळे डॉ. कुणाल खेमनार समितीचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम सातप्रमाणे या अधिनियमातील तरतुदी पार पडण्याकरिता आणि साहाय्य करण्याकरिता १२ जानेवारी २०२१ रोजी रमानाथ झा समिती गठित केली.

ठळक मुद्देमद्यप्रेमींची उत्सुकता शिगेला : दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाला आठवडा पूर्ण

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने निवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील सातसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशीवरून २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली. मात्र  एक आठवड्यानंतरही दारूबंदी उठविल्याची अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे जुन्या  रद्द केलेल्या सर्वच मद्यविक्री परवान्यांचे सरसकट नूतनीकरण होणार की नाही, याबाबत विक्रेते चिंतातूर आहेत, तर दुसरीकडे मद्यप्रेमींची उत्सुकता शिगेला, तर काहींचा सुप्त विरोध, असे जिल्ह्यातील सध्याचे चित्र आहे.दारूबंदीमुळे अडीच हजारांहून अधिक कोटींचा महसूल बुडून जिल्ह्याच्या एकूणच विकासावर मोठा दुष्परिणाम झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. त्यामुळे डॉ. कुणाल खेमनार समितीचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम सातप्रमाणे या अधिनियमातील तरतुदी पार पडण्याकरिता आणि साहाय्य करण्याकरिता १२ जानेवारी २०२१ रोजी रमानाथ झा समिती गठित केली. या समितीमध्ये विधीज्ज्ञ अ‍ॅड. प्रकाश सपाटे, अ‍ॅड. वामनराव लोहे, अ‍ॅड. जयंत साळवे, डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, निवृत्त अप्पर आयुक्त प्रदीप मिश्रा, संजय तायडे, बेबीताई उईके आदींचा समावेश होता. समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सात दिवस झालेत. मात्र राज्य सरकारने अद्याप अधिसूचना जारी केली नाही. परिणामी जुने परवानाधारक नूतनीकरणासाठी चिंतातूर, तर  दुसरीकडे मद्यप्रेमींचीही उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे सध्या  चित्र जिल्ह्यात सध्या बघायला मिळत  आहे. 

दारूबंदीवरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूचnदारूबंदी उठविल्याने कोट्यवधींचा महसूल मिळेल, जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर महसूल वाढविण्यासाठी पर्यटन क्षेत्राची व्याप्ती वाढेल आणि यातूनही महसूल वाढेल. दारूबंदी उठविल्यानंतर तस्करीला आळा बसेल, तसेच गुन्हेगारीचा आलेख कमी होईल, असे दावे सरकार समर्थकांकडून केले जात आहेत. nचंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविल्याने वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा विषयही आता ऐरणीवर आला आहे. दारूबंदी उठविण्याला अनेकांचा विरोध असल्याचेही वास्तव पुढे आले. एकूणच राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.

मद्यविक्रीचे २६ परवाने परजिल्ह्यात स्थानांतरित चंद्रपूर जिल्ह्यात ५६१ परवाने होते. १ एप्रिल २०१५ रोजी दारूबंदी झाल्यानंतर परवाने रद्द झाले. मात्र अर्थबळाच्या जोरावर देशी दारूचे आठ आणि वाईन शॉपचे १८ असे एकूण २६ परवाने परजिल्ह्यात स्थानांतरित करण्यात काहींजण यशस्वी झालेत. 

जुन्या परवान्यांचे सरसकट नुतनीकरण अशक्य?जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करताना नवीन अटी लागू होणार आहेत. जुन्या परवान्यांचे सरसकट नूतनीकरण केल्यास सध्याच्या नियमावलीचा भंग होऊ शकतो. त्यामुळे सरकारकडून सर्वंकष विचार करूनच अधिसूचना आणि तत्सम सुधारित नियमावली जाहीर होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’कडे वर्तविली आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी