कान्हाळगाव (कोरपना) : १५ आॅगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन करून कोरपना हा नवा तालुका अस्तित्वात आला. मात्र तालुका निर्मितीच्या २४ वर्षानंतरही इथल्या प्रशासकिय यंत्रणेला स्थिरता आली नसल्याने नागरिकांना अन्य स्थळी जावून आपली कामे करावी लागत आहेत.येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अभियंता (वीज), तालुका वैद्यकिय अधिकारी, शाखा अभियंता (पकडीगुड्डम धरण प्रकल्प) कार्यालय, तालुका मुख्यालयी असण्याऐवजी नांदा, गडचांदूर व उर्वरित कार्यालये राजुऱ्यातच असल्याने नागरिकांची कामे एका ठिकाणी होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना इकडून तिकडे तिकडून इकडे जाण्यात वेळ जातो. यात मोठा प्रमाणात नागरिकांची परवड होते असुन नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.तालुकाच्या निर्मितीनंतर येथे विविध कार्यालये स्थापन्यात आली त्याचा कारभार सुरू झाला. परंतु या कार्यालयाच्या स्थलांतरणाची बाब शासनाने मनावर न घेतल्याने काम एका ठिकाणी आणि कार्यालय दुसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)या कार्यालयाची व्हावी निर्मितीकोरपना या तालुका मुख्यालयी उपडाकघर, बस आगार, राष्ट्रीयकृत बँक, उपविभागीय अधिकारी (पाणी पुरवठा), जलसंपदा, पाटबंधारे, वन परिक्षेत्र अधिकारी आदी कार्यालये नसल्याने नागरिकांना इतर ठिकाणी जाऊन कामे करावी लागतातया कार्यालयाचे व्हावे स्थलांतरयेथे तालुका मुख्यालय असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अभियंता (वीज), तालुका वैद्यकिय अधिकारी, शाखा अभियंता (पकडीगुड्डम) धरण प्रकल्प कार्यालयाचे स्थलांतर केले जावे.दप्तर दिरंगाई तालुका निर्मिती झाली. मात्र जनतेचे दुर्दैवी भोग संपले नाहीत. येथे प्राथमिक सुविधांचा अभाव आणि मुख्यालयी कार्यालये नाहीत. याच परिणाम विकासावर होत आहे. फाईल्स इकडून तिकडे फिरत असल्याने नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे, क्षेत्राचा विकास अडला गेल्या दहा वर्षांपासून येथील ग्रामस्थामार्फत मंदिराला वनपट्टा देण्यात यावा, अशी मागणी आहे. यासंदर्भात वनसडी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून तसा प्रस्ताव तयार करून विभागीय वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. मात्र कोणतीच कार्यवाही न झाल्याने प्रकरण प्रलंबित आहे. हेच कारण तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आडकाठी ठरत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. कोरपना तालुक्यातील पारडी येथील शिवमंदिर व घाटराई देवस्थानाला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. त्यांना तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.परंतू येथे पायाभूत सुविधा होणे तितकेच गरजेचे आहे.- अनंता गोडे, ग्रामस्थ, पारडीपूर्वीची परिस्थिती आणि आताची मंदिराची परिस्थिती यात बराच बदल झाला आहे. मंदिरात दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे भक्तांची गैरसोय होते. पाहून निश्चित असमाधान वाटते. या परिसराचा त्वरित विकास व्हावा हीच अपेक्षा आहे.-मधुकर पुंडके, पारडी.
काम कुठे अन् कार्यालय कुठे !
By admin | Updated: February 20, 2015 00:51 IST