साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जातो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यासाठी तांदळाची मागणी केली आहे. मात्र जिल्ह्यात ८३९.८५ टन तांदूळ साठा शिल्लक असल्याने आणि तो पुरेसा असल्याने राज्यस्तरावरून तांदूळ दूळ देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे हा शिल्लक साठा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात आता शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी केळकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
कोणताही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहता कामा नये, वेळप्रसंगी उसनवारी करा, लोकसभागातून तांदूळ जमा करून विद्यार्थ्यांना पोषण आहार द्या, असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार मिळावा, त्यांचे आरोग्य सुधारावे, कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी पंधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दर दिवशी वेगवेगळा मेणू ठरवून देण्यात आला आहे. यातून शारीरिक, मानसिक क्षमता सुधारण्यास मदत होत आहे.
उसनवार करा, पण आहार द्याकोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहू नये, याची काळजी घ्यावी. शेजारील ज्या शाळांमध्ये अतिरिक्त तांदूळ असेल त्या शाळांतून उसनवारी करावी, आवश्यक असेल तर समायोजन करावे, लोकसहभाग घ्यावा; पण विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
असा आहे जिल्ह्यात तांदळाचा साठाजिल्ह्यात प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत ३१ मार्च २०२४ अखेरचा शिल्लक साठा व दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाटप केलेल्या तांदळापैकी वापर केलेला तांदूळ वजा जाता १ जानेवारी २०२५ ला जिल्ह्यात ८३९.८६ मे.टन तांदूळ शिल्लक होता. जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२५ ची तांदळाची मागणी ८०९.११ होती. यानुसार शिल्लक साठा जानेवारी व फेब्रुवारी २०२५ करिता पुरेसा आहे. असे असतानाही शाळांनी मागणी केली आहे.
राज्यस्तरावरून तांदूळ देण्यास असमर्थताजानेवारी, फेब्रुवारी २०२५ करिता जिल्ह्यात ८३९.८५ मे टन तांदूळ शिल्लक असतानाही, मागणी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर फेब्रुवारी २०२५ च्या पूर्वाधात शाळास्तरावर तांदूळ संपला असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहे. शिल्लक तांदूळ असतानाही मागणी केल्याने राज्यस्तरावर जिल्ह्याला तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे.