शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुठे कडकडीत तर कुठे संमिश्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:04 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये स्थिरता असूनही भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन दरवाढीचे चटके जनतेला बसत आहेत, असा आरोप करून काँग्रेसने सोमवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. जिल्ह्यात कुठे कडकडीत, कुठे संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देइंधन दरवाढीविरूद्ध कार्यकर्ते रस्त्यावर : गडचांदुरात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते स्थानबद्ध व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये स्थिरता असूनही भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन दरवाढीचे चटके जनतेला बसत आहेत, असा आरोप करून काँग्रेसने सोमवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. जिल्ह्यात कुठे कडकडीत, कुठे संमिश्र प्रतिसाद मिळाला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बीआरएसपी, पीरिपा व समविचारी पक्षांचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. केंद्र व राज्य सरकारविरूद्ध घोषणाबाजी करून इंधन दरवाढीचा निषेध केला. चंद्रपुरातही सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत पाळण्यात आला तर नांदाफाटा कोरपना व गडचांदूर व सिंदेवाहीत रास्ता रोको करण्यात आला. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.चंद्रपुरात सकाळी आठ वाजता शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी चौकात भाजपा सरकारविरूद्ध नारेबाजी केली. त्यानंतर शहरातील दुकाने बंद करण्यास सुरूवात केली. कॉंग्रेस, राष्टवादी कॉंग्रेस, मनसे व अन्य समविचारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फलक हातात घेउन पदयात्रा काढली. गांधी चौक, रघुवंशी कॉम्प्लेक्स, जयंत टॉकीज, जटपुरा गेट, वसंत भवन, गंजवॉर्ड, टिळक मैदान, श्रीकृष्ण टॉकीज, गिरणार चौक, श्री टॉकीज, बंगाली कॅम्प येथील दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहर अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, राजू कक्कड, मनोहर पाऊणकर, हरिशचंद्र दहिवडे, किशोर पोतनवार, दीपक जयस्वाल, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, अयुब कच्छी, नामदेव कन्नाके, अनवर मिर्झा, नितीन भटारकर, डी. के. आरीकर, हिराचंद बोरकुटे, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी नगराध्यक्षा सुनिता लोढिया, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे, महिला शहर अध्यक्षा सुनिता अग्रवाल, राष्टवादी महिला अध्यक्षा बेबीताई उईके आदी उपस्थित होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे पदाधिकारीही बंद मध्ये सहभागी झाले होते. गांधी चौकात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवून भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया गजानन गावंडे, डॉ. सुरेश महाकूलकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक कुशल पुगलिया, अशोक नागापुरे, देंवेंद्र बेले, निलेश खोब्रागडे, विना खनके, सकीना अन्सारी, चंद्रशेखर पोडे, प्रविण पडवेकर, स्वप्निल तिवारी, संगिता भोयर व कार्यकर्ते सहभागी झाले होते.ब्रह्मपुरीत पुतळ्याचे दहनब्रह्मपुरी : शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून बंदचे आवाहन केले होते. शिवाजी चौक मोदी सरकारचा प्रतिनिधिक पुतळा जाळण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस कमिेटी अध्यक्ष खेमराज तिडके, कम्युनिष्ट पार्टीचे विधानसभा अध्यक्ष विनोद झोडगे, जि. प. सदस्य राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, हितेंद्र राऊत, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर,नितिन उराडे, अशोक रामटेके, सरपंच राजेश पारधी नरेश सहारे, संदीप बगमारे, वामन मिसार, नारायण मेश्राम, जगदीश आमले, सोमेश्वर उपासे, विलास विखार, नामदेव नखाते, रामदास कामडी उपस्थित होते.दुपारनंतर चंद्रपुरातील दुकाने सुरूइंधन दरवाढीच्या निषेधार्थ चंद्रपुरात मोर्चा काढल्यानंतर आला. दरम्यान दुपारी तीन नंतर शहरातील दुकाने सुरू झाली. सकाळी काही पेटोल पंप बंद होते. आॅटो चालकांनीही या बंदमध्ये सहभागी झाले. शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी असल्याने बंदचा परिणाम फारसा जाणवला नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंदभारत बंदला चंद्रपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्ह्यातील बहुतांश प्रतिष्ठाने बंद होती.घुग्घुसमध्ये संमिश्रकांँग्रेस व समविचारी पक्षांच्या वतीने शहरात बंद पाळण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राज ुरेड्डी, इंटक नेते लक्ष्मण सादलावार, कामगार नेते सैय्यद अनवर, माजी पं. स सभापती रोशन पचारे,शेषराव ठाकरे, मुन्ना भाई लोहानी, शामराव बोबडे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सानु सिद्दीकी, जाफर शेख, इबादुल सिद्दिक, सूरज कन्नूर, तौफीक शेख, अजय उपाध्ये, अनिरुद्ध आवळे, बालकिशन कुळसंगे, बबलू सातपुते, अमित रामगिरी , प्रवीण सोदारी, अंकुश सपाटे, कोण्डय्या, रवी मडावी, रणजित राखुंडे, अनिल रामटेके, अंकेश मडावी, शुभम यादव, अमोल मांढरे, शहजाद शेख, महेंद्र बाग, खिरदीप, अजित पिरिपका, इस्लाम भाई, हरीश कांबळे, शाहरुख शेख, लकी ठाकरे उपस्थित होते.गडचांदूरगडचांदूर नांदाफाटा व कोरपना येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नांदाफाटा कोरपना व गडचांदूर या तीनही ठिकाणी निदर्शने करून रास्ता रोको करण्यात आला. गडचांदूर येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विठ्ठल थिपे, नोगराज मंगरूळकर, हंसराज चौधरी, गटनेते पापय्या पोन्नमवार, विजय ठाकुरवार, शेख अहमद, माजी सरपंच बाबाराव पुरके, डॉ. चरणदास मेश्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रोहित शिंगाडे, शैलेष लोखंडे, विक्रम येरणे, बंडू धोटे, सतीश बेतावर, मनोहर बुº्हाण, केशव डोहे, प्रितम सातपुते, प्रवीण मेश्राम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. गडचांदुरात शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.कोरपनाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, पंचायत समितीचे सभापती श्याम रणदिवे, उपसभापती संभा कोवे, जि. प. सदस्य उत्तम पेचे, दिवाकर बोरडे आदींच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. नांदाफाटा येथे जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांच्या नेतृत्वात बंद यशस्वी करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देवकर, ग्रामपंचायत सदस्य अभय म्हणून मनोहर काठे, नथ्थु तलांडे, सदाशिव परचाके, महेश राऊत उपस्थित होते.सावलीसावली येथे तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, दिनेश चिटनूरवार, वैशाली शेरकी, नंदा अल्लूरवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.