शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

हे काय? त्या वाळू घाटांवर होणार नाहीत शासकीय डेपो ?

By राजेश भोजेकर | Updated: May 9, 2023 17:45 IST

Chandrapur News संपूर्ण राज्यात वाळू घाटांवर शासकीय डेपो निर्माण करण्यात येणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात वाळूसाठा उपलब्ध असताना कुठेही शासकीय वाळू डेपो निर्माण करण्याच्या हालचाली नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

राजेश भोजेकर

चंद्रपूर : संपूर्ण राज्यात येत्या काळात वाळू घाटांवर शासकीय डेपो निर्माण करण्यात येणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. केवळ ६०० रुपये ब्रास वाळू हवी त्याला मिळणार आहे. ब्रम्हपुरी तालुक्याला वैनगंगा नदीने वेढले असून सात वाळू घाटांचा लिलाव शासकीय नियमाप्रमाणे करण्यात आला आहे. तर इतर अनेक वाळू घाटांचा लिलावच करण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाळू डेपो निर्माण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात वाळू घाट व वाळूसाठा उपलब्ध असताना तालुक्यात कुठेही शासकीय वाळू डेपो निर्माण करण्याच्या हालचाली नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

      विदर्भात वैनगंगा नदीसह अनेक नद्या वाहतात. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात अनेक वाळू घाट आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यात चारही बाजूला नदीपात्र असून अनेक घाट अस्तित्वात आहेत. यातील सात घाटांचा लिलाव शासकीय नियमाप्रमाणे करण्यात आला. पर्यावरण मान्यता संपल्याने २८ फेब्रुवारीला उत्खनन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर तब्बल दीड महिन्याने पर्यावरण मान्यता मिळाल्याने १० जूनपर्यंत उत्खनन व ३० सप्टेंबर पर्यंत वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अनेक  कंत्राटदारांनी हे वाळू घाट लिलावात घेतले आहेत. त्यात त्यांचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे की, काय तालुक्यात कुठेही शासकीय वाळू डेपो निर्माण करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. भविष्यात इतरत्र वाळू डेपो निर्माण होतील परंतु विपुल प्रमाणात वाळूसाठा उपलब्ध असताना तालुक्यात कुठेही शासकीय डेपो उभारण्यात येणार की, नाही अशी शंका नागरिकांमध्ये चर्चिली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय महसूल बुडल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती व मूल तालुक्यातच वाळू डेपो होणार असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :sandवाळू