शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

विहिरी दुरूस्तीचा अध्यादेश निष्प्रभ

By admin | Updated: June 13, 2015 01:20 IST

२०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या होत्या. त्या दुरूस्त करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तत्कालिन राज्य सरकाने अध्यादेश काढला खरा,

२०१२-१३ मधील नुकसानीचा वर्षभराने जीआर : अवधी मिळाला केवळ सात महिन्यांचागोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर२०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या होत्या. त्या दुरूस्त करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तत्कालिन राज्य सरकाने अध्यादेश काढला खरा, मात्र वर्षभराने निघालेल्या या अध्यादेशाची मुदत केवळ सात महिन्यांची असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या विहिरींची कसलीही कामे झाली नाहीत. परिणामत: हा अध्यादेशच निष्प्रभ ठरला.राज्याच्या नियोजन विभागाच्या रोजगार हमी प्रभागाने २३ मे २०१४ रोजी हा अध्यादेश काढला होता. २०१२-१३ या वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतात गाळ साचून अनेकांच्या विहिरी बुजल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या होत्या. शेतकऱ्यांंनी नुकसान भरपाईसाठी ओरड केल्यावर तत्कालिन राज्य सरकाने मदत जाहीर केली होती. बुजलेल्या विहिरीतील गाळ उपसण्याचे आणि खचलेल्या विहिरी बांधण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता करायला तब्बल वर्ष उलटले. २३ मे २०१४ रोजी या संबंधी परिपत्रक राज्य सरकारच्या नियोजन विभागाने प्रसिद्ध केले. त्यानुसार, ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत विहिरींची सर्व कामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परिपत्रक निघाल्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत फक्त सात महिन्यांचा अवधी मिळाल्याने यंत्रणेला कसलीलही कामे करता आली नव्हती. अशातच मुदत उलटून गेल्याने हा अध्यादेशच प्रभावहीन ठरल्याची बाब आता पुढे आली आहे.शासन निर्णयानुसार, अतिवृष्टीमुळे बुजलेल्या विहिरींचा महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामा करावयाचा होता. या विहिरींची नोंद सात-बारावरून कमी करायची होती. खचलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दुरूस्त करायच्या होत्या. त्यासाठी किमान दीड लाख रूपयानचे अंदाजपत्रक तयार करायचे होते. विहिरींच या दुरूस्तीची काम करताना ग्रामसभेची शिफारस आणि ग्रामपंचायतींची मान्यता आवश्यक होती. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, विमूक्त जाती, दारिद्रय रेषेखालीेल कुटूंब, स्त्री कर्ता असलेले कुटूंब, जमीन सुधारणेचे लाभार्थी, अपंग व्यक्ती, इंदीरा आवास योजनेतील लाभाथीर यांना प्राधान्य द्यायचे होते. यासाठी पूर्णत: निधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनच खर्च करायचा असल्याने राज्याच्या तिजोरीवर फारसा भारही पडणार नव्हता. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही.शेतकरी उपेक्षितचशेतकऱ्यांना कर्जाच्या आणि दु:खाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सरकार योजना राबवित असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात असे विपरित चित्र आहे. यामुळे शेतकरी उपेक्षितच आहे. मात्र या कामासाठी फक्त सात महिन्यांची मुदत मिळाली. या अल्प मुदतीमध्ये कसलेही सर्व्हेक्षण होऊ शकले नाही, परिणामत: कामही झाले नसल्याची बाब पुढे आली आहे.