शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

गणरायाचे उत्साहात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:21 IST

मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांचा उत्साह आज चरमसीमेवर होता.

ठळक मुद्देगणपती बाप्पा मोरया..: शहरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांचा उत्साह आज चरमसीमेवर होता. बाप्पा घरी येणार, म्हणून प्रत्येक गणेशभक्त हरकून गेला होता. या उत्साहातच शुक्रवारी गणरायाचे स्वागत करण्यात आले. छोटा बाजार, हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.दिवाळीनंतर गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव समजला होता. या उत्सवामुळे दहा दिवस शहरात, गावागावात भक्तीचे वातावरण राहते. यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू होती. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले होते. शुक्रवारी बाजारपेठेत गर्दी उसळण्याची शक्यता बघून अनेकांनी दोन दिवसांपासून गणेशमूर्ती विकत घेऊन ठेवल्या होत्या. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सिटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले होते. शुक्रवारी सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. हिंदी सिटी शाळेपासून जयंत टॉकीज मार्गापर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला होता.पोलिसांची गणभक्तांना मदतआपल्या लाडक्या गणरायाला अनेकांनी चारचाकी वाहन, आॅटोरिक्षातून घरी नेले. काहींनी दुचाकी आणल्या होत्या. दुचाकीवर मागे बसणाºयांच्या हातात मूर्ती ठेवायचे असे नियोजन होते. मात्र मूर्ती घेऊन दुचाकीवर बसताना अनेकांना अडचणीचे ठरत असल्याचे बघून पोलीस यासाठी मदतीला धावून येताना दिसले. अनेक दुचाकीस्वारांना दुचाकीवर बसल्यानंतर पोलिसांनी मूर्ती त्यांच्या हाती दिली.पाऊस आलाच नाहीगणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी रात्री चंद्रपूर शहरासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारीही पाऊस पडून गणेशभक्तांची आणि मूर्तीकारांची तारांबळ उडेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे मूर्तीकारांनी दुकानात पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच ऊन्ह निघाले. पुढे दिवसभरच असे कोरडे वातावरण राहिले.चोख बंदोबस्तशुक्रवारी जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याची माहिती नाही. चंद्रपुरातही शांततेच गणेशोत्सवाची सुरुवात झाली. यासाठी जिल्हा पोलीस दलानेही तगाडा बंदोबस्त ठेवला होता. ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या साप्ताहिक व इतर रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पाच उपविभागीय पोलस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक, ११० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पुरुष पोलीस कर्मचारी व ३११ अकरा महिला पोलिस कर्मचारी याव्यतिरीक्त ६०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड व एसआरपीएफ गोंदिया येथील एक प्लाटून बाराही दिवस या उत्सवावर नजर ठेवून असणार आहे.डिजेमुक्त उत्सवयंदाचा गणेशोत्सव जरा वेगळाच दिसून येणार आहे. याला कारण असे की यंदाचा हा उत्सव डिजेमुक्त असणार आहे. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवात विशेषत: गणेश विसर्जनात बॅण्ड पथक, भजन मंडळे, ढोलकी अशी वाद्ये वाजविली जात होती. मात्र कालांतराने संदल नामक वाद्य आले आणि या वाद्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यानंतर अलिकडच्या काळात डिजे आला आणि सर्व प्रकारची वाद्ये अडगळीत पडली. कुठलाही उत्सव असो, मिरवणूक असो, डिजे हमखास असलाच पाहिजे, अशी धारणा होती. मात्र या डिजेमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याने यंदा गणेशोत्सवातून डिजे बाद झाला आहे.