लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलितील काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे येथील १२० कंत्राटी कामगारांना मागील तीन वर्षांपासून वेतनवाढ होऊनही सूर्योदय कंपनीने त्या कामगारांना वेतनापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे जोपर्यंत वेतनवाढ मिळत नाही, तोपर्यंत काम सुरु न करण्याचा इशारा देत कामगारांनी सोमवारपासून आंदोलन पुकारले आहे.‘समान काम-समान वेतन’ या न्यायाने कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांप्रमाणेच वेतन द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यातील निवाड्याचा आधार घेत आता देशभरातील सरकारी, शासकीय, निमशासकीय व खासगी ठिकाणी काम करणाºया सर्व कंत्राटी कामगारांना ‘समान काम-समान वेतन’ धोरणाप्रमाणे लाभ देणे गरजेचे आहे. मात्र वेकोलि माजरी अंतर्गत असलेल्या सूर्योदय कोल कॅरियर कंपनीद्वारे शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना वेतन वाढ दिली नाही. त्यामुळे कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सूर्योदय कोल कॅरियर कंपनीमध्ये एकूण १२० कामगार आहेत. या कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.वाढीव वेतनाचा प्रश्न, आरोग्याच्या सुविधा, पीएफ बाबत अनेकवेळा मागण्याकरूनही दुर्लक्ष केले जात आहे. २०१७ पासून कामगारांचे वेतनवाढ प्रक्रिया रखडली आहे. या आंदोलनात कोणतेही कामगार संघटना व राजकीय पक्ष सहभागी नसून, कामगारांनीच सदर आंदोलन पुकारले आहे यासंदर्भात कामगारांनी मुख्यमहाप्रबंधक, जिल्हाधिकारी, ठाणेदारांना निवेदन दिले. मात्र सर्वांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारपासून कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे.कोल इंडियाकडून नियमानुसार आमच्या कंपनीला टेंडर मिळाले. यामध्ये कोल इंडियाने ठरविलेल्या वेतनाप्रमाणे कामगारांना वेतन देण्यात येत आहे. - सुबेदार सत्यवान,व्यवस्थापक, सूर्योदय कोल कॅरियर प्रायव्हेट लिमिटेड
वेतनसाठी वेकोलिच्या कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST
‘समान काम-समान वेतन’ या न्यायाने कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांप्रमाणेच वेतन द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यातील निवाड्याचा आधार घेत आता देशभरातील सरकारी, शासकीय, निमशासकीय व खासगी ठिकाणी काम करणाºया सर्व कंत्राटी कामगारांना ‘समान काम-समान वेतन’ धोरणाप्रमाणे लाभ देणे गरजेचे आहे.
वेतनसाठी वेकोलिच्या कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन
ठळक मुद्देमाजरी कोळसा खाण : २०१७ पासून मिळाली नाही वेतनवाढ