सिंदेवाही : विशेष निधी अंतर्गत सिंदेवाही नगरपंचायत क्षेत्रातील आठवडे बाजार विकसित करणे व समशानभूमी बांधकामासह खुले भूखंड सौंदर्यीकरणाच्या कामाला चार कोटी मंजूर झाले. या कामाला शनिवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुरूवात केली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत, राकेश रत्नवार, नगराध्यक्ष आशाताई गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्नील कावडे, मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, लोनवाही सरपंच समर्थ, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, काँग्रेसचे ज्येष्ठ अरुण कोलते, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उत्तरवार, महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, नगरसेवक भूपेश लाखे, युनुस शेख, जीवने, वीरू जयस्वाल, राहुल पोरडीवार, सचिन नाडमवार, मयूर सुचक तथा नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
आठवडे बाजार व स्मशानभूमी बांधकामाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST