शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 10:19 IST

कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे.

ठळक मुद्देनदीपात्रातच बांधला मातीचा रपटा

रवी जवळे।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे.चंद्रपुरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदी पूर्वी या चांदागडची जीवदायिनी होती तर आता इरई नदी चंद्रपूरकरांची तहान भागवित आहे. असे असतानाही या दोन्ही नद्यांची उद्योगांनी वाट लावली आहे. इरई नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले आहे. बल्लारपूर पेपरमील, चंद्रपूर वीज केंद्रामधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. इरई वाचविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केल्यामुळे अखेर शासनाला याबाबत गंभीर व्हावे लागले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. काही प्रमाणात इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. अजूनही हे काम अपूर्णच आहे. अशातच आता वेकोलिने पुन्हा एक संतापजनक प्रकार केला आहे.वेकोलिच्या चंद्रपूर शहराला सभोवताल खुल्या व भूमिगत कोळसा खाणी आहेत. वेकोलिच्या चंद्रपूर क्षेत्रांतर्गत दुर्गापूर हे उपक्षेत्र येते. या उपक्षेत्रात पायली, भटाळी येथे खुल्या कोळसा खाणी आहेत. भटाळी कोळसा खाणीकडे जाताना भटाळी गावामधून जावे लागते. इरई धरण- ताडोबा व्याघ्र प्रकल्प या जोडरस्त्याच्या बाजुने भटाळी गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रपट्याच्या काही अंतरावर केवळ दोन पाईप टाकून इरई नदीच्या पात्रातच मातीचा रपटा बनविला आहे. यामुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र व पाण्याचा प्रवाह अडला आहे. या रपट्यावरून वेकोलिचीवाहने मार्गक्रमण करीत आहेत. वास्तविक, कुठल्याही नदी वा तिच्या प्रवाहासोबत अशी छेडछाड करता येत नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासन, सिंचन विभाग आदींची परवानगी घ्यावी लागते. मात्र असे काहीही न करता वेकोलिने आपल्या स्वार्थासाठी थेट इरईचा प्रवाहच अडवून धरला आहे.

वेकोलिने पूल बांधावाभटाळी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रपटा आहे. या रपट्याजवळच वेकोलिने मोठा पुल बांधल्यास इरईच्या पात्राला धक्का लागणार नाही. मात्र पैसे वाचविण्यासाठी तसे न करता सरळ नदीपात्रातच मातीचा रपटा बांधून वेकोलि अधिकारी मोकळे झाले आहेत.

यापूर्वीही केला होता असाच प्रकारवेकोलिने यापूर्वी माना खाणीजवळ इरई नदीच्या काठावर माती टाकण्यासाठी रपटा तयार केला होता. तेव्हा वृक्षाई, इरई नदी बचाव जनआंदोलन या पर्यावरणवादी संघटनेने त्याला कडाडून विरोध दर्शविला होता. ‘लोकमत’नेही वेकोलिच्या या संताजनक प्रकाराकडे लक्ष वेधले होते.

भटाळीजवळच्या इरई नदी पात्रात रपटा करण्यासाठी वेकोलिने कुठल्याही प्रकारची परवानगी मागितलेली नाही. वास्तविक सिंचन विभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही नदीच्या पात्राला हात लावता येत नाही.- संतोष खांडरे,तहसीलदार, चंद्रपूर.इरई नदी वाचविण्यासाठी वारंवार आंदोलने केली. नदीपात्रात बसून सत्याग्रह केला. आता इरई नदीचे खोलीकरण करण्यात येत आहे. असे असताना दुसरीकडे वेकोलिने पात्रातच रपटा तयार करून नदीला अडविले. हा प्रकार संतापजनक आहे.- कुशाब कायरकरअध्यक्ष, वृक्षाई संस्था, चंद्रपूर.

टॅग्स :riverनदी