शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आगडी येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; महिलांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:50 IST

Chandrapur : सणासुदीत पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील आगडी येथे मागील चार दिवसांपासून २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र नियमित पाणीपुरवठा करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.

कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वी २४ ग्रीड पाणीपुरवठा योजना अमलात आणली. जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करीत प्रत्येक कुटुंबाला नळाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र त्या नळाद्वारे कुटुंबाला नियमित पाणीपुरवठा होतो की नाही, याकडे प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा योजना शोभेची वास्तू ठरली असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी अपयशी ठरत आहे. गावात दोन विहिरी आहेत. मात्र विहिरीचे पाणी गढूळ असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने सदर विहिरीचे पाणी पिण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मागील तीन दिवसांपासून २४ ग्रीड पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या विरोधात गावकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. 

शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चुन २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. मात्र दोन वर्षातच योजनेला घरघर लागली असून सदर योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यास यंत्रणा असमर्थ ठरत आहे. त्यामुळे योजनेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले.

"मागील चार दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रशासनाने तत्काळ नियमित पाणीपुरवठा सुरु करावा." - शालिनी दामोधर लेनगुरे, गृहिणी आगडी

"२४ गाव ग्रीड योजनेंतर्गत मौजा जानाळा व आगडी येथे पाणीपुरवठा योजना दोन वर्षापूर्वी अमलात आणली. मात्र गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यास सदर योजना अल्पावधीत कुचकामी ठरली असून मागील चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेला सूचना करूनही दुर्लक्ष करीत आहे."- दर्शना किन्नाके, सरपंच ग्रामपंचायत जानाळा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई