शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्यावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:27 IST

महानगरपालिका झाल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विद्युत दरातही वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे निर्माण झालेली तफावतीची रक्कम मनपाने द्यावी, ....

ठळक मुद्देमनपाची आमसभा : विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका झाल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विद्युत दरातही वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे निर्माण झालेली तफावतीची रक्कम मनपाने द्यावी, अशी मागणी पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने केली होती. हा विषय मनपाच्या सोमवारी झालेल्या आमसभेत चर्चेसाठी ठेवताच काही नगरसेवकांनी याला विरोध केला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये या विषयावरून मतभेद निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला.चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सभेला सुरुवात होताच पाणी पुरवठ्याच्या वाढीव विद्युत दरामुळे निर्माण झालेली तफावत व ती रक्कम देण्याचा विषय सभागृहासमोर ठेवण्यात आला. परंतु, या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांतच मतभेद दिसून आला. शहराला पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट २०११ मध्ये उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला हस्तांतरित करण्यात आले. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यामुळे वीज दरात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून वाढीव वीज दराची तफावत रक्कम देण्याची मागणी पाणीपुरवठा कंत्राटदाराने प्रशासनाकडे केली आहे. यानंतर १८ डिसेंबर २०१५ मध्ये तफावत रक्कम देण्यासंदर्भात आमसभेत चर्चा झाली. त्यावेळी गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर रक्कम देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. नंतर १९ सप्टेंबर २०१६ च्या आमसभेत नगरपालिका आणि महानगरपालिका काळातील वीज दर तपासून तफावत रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, अजूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आजच्या सभेत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी करारात तफावत रक्कम देण्याचे ठरले नसल्याचे सांगत विरोध दर्शविला. आणखी काही नगरसेवकांनीही याला विरोध दर्शविला. यापूर्वी दोनदा झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता पुन्हा तोच विषय चर्चेसाठी आणून सभागृहाचा अवमान केला जात असल्याचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी म्हटले. या विषयावरून चांगलाच गोंधळ झाल्याने महापौर अंजली घोटेकर यांनी प्रशासनाने यावर निर्णय घ्यावा, असे जाहीर केले. तसेच जुने कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटाची निविदा लवकरात लवकर काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची सुविधा केल्यानंतरच नवीन बांधकामाला मंजुरी देणे आवश्यक होते. परंतु, अनेक नवीन बांधकाम करताना याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा विषय सुनिता लोढिया यांनी उपस्थित केला. तेव्हा महापौर घोटेकर यांनी शहरातील सर्व नवीन बांधकामांची तपासणी करावी. रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची सुविधा नसलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपायुक्त विजय देवळीकर उपस्थित होते.पाण्याच्या टाकीची सुरक्षितता तपासणारयानंतर नेताजी सुभाषचंद्रबोस शाळेची जीर्ण इमारत पाडून तेथे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. वडगाव पाण्याच्या टाकीवरून सोनू सोनवणे या १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. त्यामुळे टाकीच्या परिसरात संरक्षण भिंत उभारून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी नगरसेविका सुनीता लोढिया यांनी केली. तेव्हा महापौरांनी शहरातील सर्व टाक्यांची पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.रामाळा तलाव परिसरात सुरक्षारक्षकरामाळा तलाव परिसरात स्टंटबाजीमुळे दोन युवकांना जीव गमवावा लागला. मनपाने तलावाचे सौंदर्यीकरण केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या परिसरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला.आर्थिक भुर्दंड नाहीचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून महानगरपालिका पाण्याची उचल करीत आहे. त्यामुळे मलनिस्सारण योजनेंतर्गत निघणारे पाणी देण्याची मागणी वीज केंद्राने मनपाकडे केली होती. २१२ कोटींच्या एसआयटीसीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देखभाल दुरुस्ती करणाºया कंपनीकडेच मनपाचा हिस्सा भरण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे मनपावर कुठलाच आर्थिक भूर्दंड पडणार नसल्याचे आयुक्त विजय देवळीकर यांनी स्पष्ट केले.