शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

वसाहतीतून हटविण्यासाठी ८४ घरांचा पाणीपुरवठा अन् वीज कापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:07 IST

वेकोलिचा प्रताप : संतप्त महिलांची वेकोलि कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : अनेक वर्षांपासून बल्लारपूर वेकोलि उपक्षेत्रातील वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांना हटविण्यासाठी वेकोलि प्रशासनाने ७ मेपासून वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ८४ घरांवर अशी कारवाई केल्याने संतप्त महिलांनी गुरुवारी (दि. १) वेकोलि कार्यालयावर मोर्चा नेऊन तीव्र विरोध केला.

शहरातील शहीद भगतसिंग व सुभाष वॉर्डात वेकोलिची वसाहत आहे. या वसाहतींमध्ये आधी वेकोलित काम करणारे कामगार राहत होते. मात्र, सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ही वसाहत सोडली नाही. ज्यांनी सोडली त्या जागेवर बाहेरच्या व्यक्तींनी बेकायदा कब्जा केल्याचा वेकोलि प्रशासनाचा आरोप आहे. त्यामुळे वेकोलिने क्वॉर्टर खाली करण्याच्या नोटिसा संबंधित कुटुंबांना बजावल्या. सूचना देऊनही या कुटुंबांनी घर खाली केले नाही. वेकोलि प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन महावितरण, पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र सुरक्षा बल घेऊन घरे खाली करण्याची मोहीम सुरू केली आहे. वसाहतीत बेकायदेशीर राहणाऱ्यांना क्वॉर्टर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या जात आहेत.

वीज व पाण्यावर लाखोंचा खर्चवेकोलिकडून वीज च पाणीपुरवठा केला जात असल्याने वर्षाला लाखोंचा खर्च होतो. पण, तिथे राहणाऱ्यांकडून कराच्या रूपात काहीही मिळत नाही. त्यातच वसाहतीमधील अनेक घरे जीर्ण झाली.पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो. वेकोलिने नोटिसा बजावूनही करजा असणारे कुटुंब ती वसाहत सोडायला तयार नाही. 

वेकोलिची कारवाई कशासाठी?निवृत्ती झाल्यानंतरही अनेकांनी वसाहत सोडली नाही. शिवाय वेकोलिचे कर्मचारी नसताना काहींनी बळजबरीने वसाहत ताब्यात घेतली. त्यामुळे संबंधितांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले, असा दावा वेकोलिने केला आहे.

मोर्चा काढल्याने तूर्त कारवाई स्थगितवेकोलि महाव्यवस्थापक इलियास खान यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर उपक्षेत्राचे अधिकारी कलकल, कार्मिक व्यवस्थापक शब्बीर खान तडवी यांच्या देखरेखीत वेकोलि वसाहतीत बेकायदा राहणाऱ्या ८ ब्लॉगमधील ६४ घरांची वीज व २० घरांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी मोर्चा काढल्याने आज कारवाई बंद होती.

कुटुंबांचे म्हणणे काय?कुठलीही कार्यवाही नियमानुसार व्हायला हवी. वेकोलिने आमचे म्हणणे जाणून न घेता थेट कारवाईचे पाऊल उचलले, वीज व पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न शहीद भगतसिंग व सुभाष वॉर्डाच्या वेकोलि वसाहतींमधील नागरिकांनी केला आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर