शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई: चंद्रपूर जिल्ह्यातल्या घनपठार गावातील निम्मे गावकरी गाव सोडून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:54 IST

जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत.

ठळक मुद्देदीड कि.मी. पायी जाऊन आणावे लागते रोजचे पाणीगढूळ पाणी पिऊन जगत आहेत गावकरीप्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क संघरक्षित तावाडे चंद्रपूर: जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत. सध्याची गावातील पाण्याची स्थिती पाहता काही दिवसात उरलेली कुटुंबेही दुसऱ्या गावांच्या आश्रयाला जातील अशी शक्यता तेथे वर्तविली जात आहे.या गावातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. येथे असलेल्या नळांना पाणी नाही. गावातील टाकीत पाणी नाही. जे थोडेफार पाणी आहे ते अतिशय गढूळ व आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असे आहे. त्यामुळे नागरिकांना ररोज दीड कि.मी. ची पायपीट करून रोजचे पाणी भरावे लागत आहे. त्यात डोक्यावर तापणारे उन त्रस्त करत आहे. अशा कारणांमुळे या गावातील जवळपास निम्मी कुटुंबे दुसऱ्या गावांच्या आश्रयाला किंवा जिथे पाणी आहे अशा शेतात रहायला गेली आहेत. या गावात पाण्याची मोठी टाकी होती. मात्र त्या टाकीला मोठे भगदाड पडल्याने व त्याची दुरुस्ती न झाल्याने गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावकरी पहाटे चार वाजता उठून दीड कि.मी. खडतर वाट चालून जातात. तेथे नाल्यात असलेले गढूळ पाणी एका लहानशा भांड्याने भरून घेतात. हेच पाणी आम्ही जनावरांनाही देतो व आम्हीही वापरतो असे त्यांचे सांगणे आहे.येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देत नाहीत अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. या गावात टँकर सुरू करावा अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणी