शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

बारसागड येथे पाणी टंचाई

By admin | Updated: June 14, 2016 00:37 IST

तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दीड महिन्यापासून तीन हातपंप बंद सावली : तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर हातपंप दुरुस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.बारसागड येथील लोकसंख्या ३२५ च्या घरात आहे. येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाच्या योेजनेतून गावात हातपंप योजना राबविण्यात आली. मात्र येथील तीन हातपंप मागील दीड महिण्यापासून बंद स्थितीत आहेत. येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी १४ एप्रिल रोजी पंचायत समिती येथील नोंद रजिस्टरवर हातपंप दुरुस्तीची मागणी केली होती. सचिवांच्या उपस्थितीत बंद हातपंप दुरुस्तीबाबत ठराव पारित करण्यात आला. परंतु दीड महिण्याचा कालावधी लोटूनही हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली नाही. गावातील तीन हातपंप बंद असल्यामुळे नागरिक दोन विहिरीवरच आपली तहान भागवित आहेत.मात्र, यापैकी एक विहीर मागील आठवड्यात कोरडी पडल्याने महिलांना गावाबाहेरील विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. सध्या गावात एकाच विहिरीवरुन पाणीपुरवठा होत आहे.त्या विहिरीची पातळीसुद्धा खोलवर गेली आहे. त्यामुळे आता बारसागड येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसात पाऊस पडला नाही तर गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात येथील हातपंप दुरुस्त न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही लोडे यांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)