शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मिळेल त्या भांड्यात साठवावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:50 IST

गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

ठळक मुद्देचार्ली येथील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष : वेकोलिद्वारा टँकरने पाणी पुरवठा; मात्र प्रशासनाने लक्ष नाही

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप हालचालही केलेली नाही.राजुरा तालुक्यातील चार्लीवासीयांची पाणी मिळविण्यासाठी चाललेली धडपड प्रशासनाच्या नियोजनाला लाजविणारी आहे. राजुरा तालुक्यातील चार्ली - निर्ली परिसरात पाण्याचे मुबलक साठे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात याठिकाणी दरवर्षी नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चार्ली या एक हजार १४० लोकसंख्येच्या गावातील बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने भर उन्हाळ्यात गावकºयांचा पाण्यासाठी केविलवाना संघर्ष सुरू झाला आहे.येथील नागरिकांना गुंडभर पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली असताना तालुका प्रशासनाने गावकºयांना पाण्याची कुठलीही व्यवस्था करून दिलेली नाही. गावात पाण्याचा एवढा दुष्काळ सुरू असतानाही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या गावाला भेट दिली नाही. चार्ली गावात नागरिकांना थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना तालुका प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, हे गावकºयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. चार्लीवासीयांचा पाण्यासाठी होणारा हाल लक्षात घेता गावकºयांनी अनेकदा वेकोलि प्रशासनाला पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टमधून गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात पाण्याचे टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. महिलांसह लहान मुले, आबाळवृद्धही गुंडभर पाण्यासाठी धडपड करीत असतात. घरातील मिळेल त्या भांड्यात टँकरमधून पाणी घेतात व साठवून ठेवतात. यासाठी वेकोलि प्रशासनाने गावकºयांना टँकरची तात्पुरती व्यवस्था करून दिली असली तरी एका टँकरवर नागरिकांची तहाण भागणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने वा जिल्हा परिषद प्रशासनाने पाणी टंचाई निवारण आराखड्यानुसार उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्षभर उन्हाळ्यात चार्लीवासीयांचा पाण्यासाठी चाललेला संघर्ष प्रशासनाला दिसून येत नाही, हे दुर्दैव आहे. नागरिकांच्या नशिबी दिवसरात्र पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ आल्यानंतरही तालुका प्रशासनाचे अधिकारी एवढे अनभिज्ञ कसे ? एकीकडे पाण्यासाठी गावकºयांचे हाल होत असताना गावाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अंधारल्या रात्रीही नागरिकांना मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई