शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात

By admin | Updated: August 19, 2014 23:37 IST

सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिमेंट कंपन्याकडून उपसा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना

रत्नाकर चटप - लखमापूरसर्वत्र दुष्काळाचे सावट दिसत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिमेंट कंपन्याकडून उपसा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसून उपलब्ध पाणी कंपन्यांच्या घशात जात आहे. दुष्काळात वरदान ठरणाऱ्या अंमलनाला आणि पकडीगुड्डम धरणाचे पाणी फक्त कंपन्यासाठी का, असा सवाल आता निर्माण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत. आॅगस्ट महिना संपत असतानादेखील पाऊस नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढील दिवसात शेती आणि पिण्याचे पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न कोरपना तालुक्यातील जनतेला पडला आहे. या तालुक्यात वर्धा नदी, अंमलनाला व पकडीगुड्डम धरण हे प्रमुख पाण्याचे स्रोत असून इतर छोटे बारमाही नाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने यामधील पाण्याची पातळी घसरली आहे. याचा परिणाम शेती, उद्योग व नागरिकांना भोगावा लागणार आहे. त्यासाठी नदी, धरणे व बारमाही नाल्यांमधील पाण्याचा उपसा थांबविण्याची गरज आहे. परंतु तालुक्यातील सिमेंट कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प का, अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. कोरपना तालुक्यात १९८५ साली अंमलनाला व १९९१ साली पकडीगुड्डम धरणाचे बांधकाम करण्यात आले. अंमलनाला धरणाअंतर्गत खरीप हंगामात २३४६ हेक्टर तर रब्बी हंगामात १२०२ हेक्टर जमीनीला या जलाशयाचा फायदा होऊ शकतो. या धरणाअंतर्गत तालुक्यातील बैलम, हिरापूर, इसापूर, सोनापूर, गडचांदूर, धामनगाव, पिंपळगाव, नांदा,बिबी, उपरवाही, भेंडवी, मंगी, चंदनवाही, पांढरपवनी, विहीरगाव, वांगी, भुरकूंडा, पाचगाव व लाईनगुडा या २२ गावांना पाणीपुरवठा होतो. पकडीगुड्डम धरणाचे पाणी एका सिंमेट कंपनीला २५.७२ टक्के देण्याचा करार झाल्याने केवड ५७ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. याऊलट सिंचन विभागाने प्रयत्न करुनही १६५ हेक्टर लाभक्षेत्रातील जमीन सिंचनापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे पिपर्डा, वनसडी, पिपरी, धानोली, लोणी, सोनुर्ली, माथा, वडगाव, इंजापूर, खिरडी, बेलगाव, धनकदेवी या गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करताच १२ गावांनी ग्रामसभेत ठराव पारित केला. त्यानंतर सुमारे ९५५ हेक्टर या करारामुळे वंचित राहिली तर प्रादेशिक नळ योजनेला ३.५६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्याच्या कराराने एकूण ११३१ हेक्टर जमीन आज सिंचनाला मुकली आहे. त्यामुळे येणाऱ्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी सदर धरणाचे पाणी वाचविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्धा नदीमधूनही सिमेंट कंपन्यांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे सदर पाण्याचा उपसा थांबवून नागरिकांसाठी व शेतीला सिंचनासाठी पाणी देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तालुक्यातील ११३ गावांपैकी जवळपास २५ गावांना केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही तीव्र पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. यात अनेक घरगुती बोअरवेल, विहिरींची पाण्याची पातळी खालावत असून नळ योजनेचेही बारा वाजले आहे.