शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

गणेशोत्सव सुरू होताच पाऊस गायब झाला होता. त्यामुळे उकाडा वाढला. धान उत्पादक शेतकरीही चिंतित होते. रविवारी सायंकाळी बाप्पाचे विसर्जन सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला होता.  बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धुव्वाधार बरसणे सुरू झाले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस बरसल्याने नाले व तलाव तुडुंब भरले. काही ठिकाणी मार्ग बंद झाल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सोमवारपासून सुरू झालेला पाऊस रात्री थोडी उसंत दिल्यानंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार बरसला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.  या पावसामुळे काढणीच्या टप्प्यात असलेल्या सोयाबीनला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव सुरू होताच पाऊस गायब झाला होता. त्यामुळे उकाडा वाढला. धान उत्पादक शेतकरीही चिंतित होते. रविवारी सायंकाळी बाप्पाचे विसर्जन सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला होता.  बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धुव्वाधार बरसणे सुरू झाले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस बरसल्याने नाले व तलाव तुडुंब भरले. काही ठिकाणी मार्ग बंद झाल्याची माहिती आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यात आहेत. अशा स्थितीत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहेत,   नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली व सिंदेवाही तालुक्यात भातशेती अधिक असल्याने हा पाऊस उपयुक्त असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.दरम्यान, चंद्रपूर शहरातील काही सखल भागात भाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरवेळीप्रमाणे येथील आझाद बागेजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील सिस्टर काॅलनी, नगिनाबाग, बंगाली कॅम्प,  तुकूम, दुर्गापूर रस्त्यासह अन्य ठिकाणीही रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

 

टॅग्स :Rainपाऊस