शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.

कमी दाबाचा वीज पुरवठा : विद्युत उपकेंद्राला मंजुरीची प्रतीक्षाचंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी मोटारपंप चालत नसुन विहीरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असुनही शेती सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे.वर्धा नदी पट्टयातील कोलगाव, कढोली बु., मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सुर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपीक आहे. कापूस, मिरची, सोयाबीन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपल्या शेतात मोठी गुंतवणूक करून बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असतानादेखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. पिकांना पाण्याची गरज असतांनाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.या परिसराला विरूर स्टेशन येथील सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीज पुरवठा होतो अथवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सबस्टेशनचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असुन वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांच्या अडचणींचा विचार करून संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, अरूण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहु पाटील भोयर, एकनाथ कौरासे, कवडू पाटील कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलीक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपतराव हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, प्रदीप दुबे, संजय उमरे, प्रमोद धांडे, विजय धांडे, रामदास पंधरे, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, अनिल बहिरे, विजय निवलकर, अनिल आस्वले, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (प्रतिनिधी)