शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

बोरमाडा ते वैनगंगा नदी घाट रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: March 13, 2015 01:04 IST

मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे.

गेवरा: मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे. सदर रस्त्याच्या कडेला तीन ते चार वर्षापासून गिट्टी, मुरुमाचे ढग टाकून ठेवलेले आहेत. पहिला कोट बोल्डर टाकून थातूर-मातूर मुरमाचा मुलामा देण्यात आला. तेव्हापासून ग्रामपंचायतीने रस्त्याचे पुढील काम केले नाही. ग्रामपंचायतीने या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामपंचायतीने सदर कामासाठी पुरवठा धारक कंत्राटदाराला साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली संपूर्ण काम पूर्ण करण्याचे कंत्राट दिले. परंतु स्थानिक मजुरांना या ठिकाणी अल्प मजुरी दिली जात आहे. लागूनच असलेल्या गडचिरोली शहरात यापेक्षा अधिक मजुरी मिळत असल्याने मजूर या कामावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. मग्रारोहयोच्या कामातील मजुरी मध्ये बरीच तफावत असल्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतीस मजुरांचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे सदर रस्त्याचे पुढील बांधकाम होण्यास अडथळा निर्माण झाल्याचे सरपंच व कंत्राटदाराने यांनी सांगितले. मग्रारोहयो कायद्यातील नियमाप्रमाणे कामाच्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता नसल्यास पाच किलोमीटरच्या परिसरातील मजुरांना कामावर ठेवून उचित दस्ताऐवजांमध्ये योग्य नोंदी घेवून काम पूर्णत्वास आणता येणे शक्य होते.परंतु तशा प्रकारचा कोणताही प्रयत्न बोरमाळ ग्रामपंचायतीने केला नाही. परिसरात अनेक रस्त्यांच्या कामावर परिसरातील मजुरांव्यतिरिक्त बोहरुन मजूर आयात करुन सर्रास मग्रारोहयोचे नियम धाब्यावर बसविल्या जात आहे. याला बोरमाळा ते नदीघाट रस्ता अपवाद ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर रस्ता हा पंचक्रोशितील अत्यंत महत्वाचा रस्ता असून येथून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. याच रस्त्याने मोठ्या संख्येने मजूर, शेतकरी, भाजी विक्रेते, दुधविक्रेते, तूप, दही, आदी विक्रीसाठी वैनगंगा नदी पार करून जातात. यातील काही लोक पायदळ तर काही सायकलीने जातात. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने त्याचा मोठा त्रास सहन नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)