वढोली: गोंडपीपरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका नुकताच तालुक्यातील एका युवकाने पतालुस एव्हरेस्ट सर करण्याचा मान पटकवला. गावातील तरुणांचे खेळांकडे वाढते आकर्षण बघता सकमुर येथील युवकांनी क्रीडांगण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
निरोगी आयुष्यासाठी खेळ महत्वाचे आहे. खेळामुळे मुलांतील अंतर्गत कलागुणांना वाव मिळतो. गावात खेळायला सोयीच क्रीडांगणच नसेल तर हे दुर्देव आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर या गावात पंधरा वर्षापुर्वी जिल्हा परिषद शाळेचे क्रिडांगण होते. पण त्यात एक-एक नव्या ईमारती उभारता संपुर्ण क्रिडांगण हे इमारती खाली दाबल्या गेले. निवेदन देऊनही क्रिडांगणाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे तेथील काही स्थानिक युवकांची क्रिडांगणासाठीची धडपळ सुरु केली असून लोकप्रतीनिधी, प्रशासनाला निवेदन दिले आहे.