शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आदिलाबाद पॅसेंजरची प्रवाशांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:56 IST

वणी येथील रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेकडून गेल्या ३० वर्षापासून नागपूर आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा- माजरी -वणीमार्गे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु अजूनपर्यंत ही पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांना या ट्रेनची अजूनही प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे३० वर्षांपासूनची मागणी : रेल्वे नसल्याने प्रवाशांची गैरसोय

राजेश रेवते।लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वणी येथील रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेकडून गेल्या ३० वर्षापासून नागपूर आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा- माजरी -वणीमार्गे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु अजूनपर्यंत ही पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांना या ट्रेनची अजूनही प्रतीक्षा आहे.नागपूर-आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा-माजरी- वणी मार्गे सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाश्यांची आहे. ही रास्त मागणी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गे पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता व माजरी ते आदिलाबादपर्यंतचा रेल्वे लाईन रेल्वे सिग्नल, रेल्वे गेट, रेल्वे प्लॅटफॉर्म व संबंधित सर्व सुविधांकरिता करोडो रुपये खर्च करून काम करण्यात आले. परंतु रेल्वे प्रशासनाद्वारे १८ वर्षे काम पूर्ण होऊनही या मार्गावर अजून नागपूर-आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन सुरू झालेली नाही.माजरी ते आदिलाबाद रेल्वे रुळाचे व इतर महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यावर २ फेब्रुवारी २००३ मध्ये ही गाडी सुरू होईल. असे रेल्वे प्रवासी वाहतूक संघाला तोंडी माहिती देत होते. आज जवळजवळ २० वर्ष होऊनही ही ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.दरवर्षी केंद्र सरकारचे रेल्वे मंत्री हे अनेक रेल्वेगाड्या सुरू करण्याचा खोटे आश्वासन देत असतात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही पॅसेंजर ट्रेन अजून सुरू झाली नाही. याकडे रेल्वे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासी वाहतूक संघाने केला आहे. दिवसेंदिवस बसच्या तिकीट दरात मोठी वाढ होत असल्याने प्रवाशांना रेल्वेचा प्रवास सोईस्कर होत असते.अनेक रेल्वेगाड्या सुरूमाजरी आदिलाबाद या मार्गावर नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, पूर्णा- पटणा एक्स्प्रेस, नांदेड- संत्रागाची एक्स्प्रेस, कोल्हापूर बोधगया दीक्षाभूमी एक्स्प्रेस आणि मुंबई- काझीपेट ही साप्ताहिक ट्रेन सुरू झाली. परंतु गेल्या ३० वर्षांपासून मागणी असतानाही नागपूर- आदिलाबाद ट्रेन सुरू झाली नाही, हे रेल्वे प्रवाशांचे दुर्दैव आहे.

टॅग्स :railwayरेल्वे