शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

नांदा ग्रामवासीय प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रतीक्षेत

By admin | Updated: July 17, 2017 00:45 IST

कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले नांदा हे गाव ओद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आले आहे.

ओ.पी.डी. सुरु करण्याची मागणी : जागेच्या परवानगीअभावी बांधकाम रखडलेलोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले नांदा हे गाव ओद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आले आहे. कारखान्यांमुळे आपल्या पोटाची खडगी भरण्याकरिता या परिसरात बाहेर गावून तसेच पर राज्यातून अनेक नागरिक आले आहेत. यामुळे दिवसेंदिवस या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. गावाची लोकसंख्या पंधरा हजार आहे. मात्र येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. तीन वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळूनही ग्रामवासीयांना त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. गावाची बाजारपेठ मोठी असल्याने परिसरातील इतर गावातील नागरिक खरेदी विक्रीसाठी येत असतात. तसेच उद्योग समूह गावाला लागूनच असल्याने मालवाहू ट्रक, दुचाकी, चारचाकी तसेच इंग्रजी विद्यालये, महाविद्यालय असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची सततची वर्दळ असते. किरकोळ अपघात रोजच होत असतात. अपघात झालेल्या रूग्णास प्रथमोपचार करून त्यांना ८ किमी अंतरावर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र गडचांदूर येथे पाठवावे लागते. अथवा खासगी दवाखान्यात उपचार करावा लागतो. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही नागरिकांचा बळीसुद्धा गेला आहेत. अपघात झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यास खासगी दवाखान्यात टाळाटाळ केली जाते. त्यामुळे पुढील उपचाराकरिता नेताना वाटेतच रुग्ण दगावल्याच्या बरेचश्या घटना घडल्या आहेत. गोरगरीब जनतेला महागडा उपचार परवडण्याजोगा नाही. पावसाळ्यात तर मलेरिया, चिकन गुनिया, गॅस्ट्रो, टायफाईड, यासारख्या आजाराची लागण होत असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात या आजारांवर कमी पैशात चांगले उपचार होत असतात. त्यामुळे गावात ओ.पी.डी. सुरु करून गोरगरिबाना आरोग्य सेवा द्यावी, अशी मागणी नांदा ग्रामवासीयांनी केली आहे.