सोमवारी उमेदवारांचा फैसला लागणार आहे. आता उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना निकाल व गुलाल उधळण याची प्रतीक्षा लागली आहे. सिंदेवाही तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. उमेदवार आपली जिंकण्याची गणिते मांडत आहे. सिंदेवाही तालुक्यात मतदानाची टक्केवारी विक्रमी झाली आहे. त्यामुळे लढती अटीतटीच्या होतील, असा अंदाज लावला जात आहे. मतदारांनी आपले मत टाकले, आता केवळ चर्चा करून सरपंच कोण होईल, याचा अंदाज मतदार बांधत आहेत. आता निवडणूक झालेल्या गावात कोणत्या पॅनलचे बहुमत येते, याकडे राजकीय पक्षांचे, नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सगळेच उद्या १० वाजताच्या ठोक्याची वाट पाहात आहेत. पॅनल लढणारे नेते व त्याचे गावातील कार्यकर्ते गुलाल उघडण्याची वाट पाहत आहेत. उद्या तहसील कार्यालयातील पटांगणात १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. एकूण आठ टेबलवर १३ फेऱ्या होणार आहेत. एका फेरीत दोन ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत. आता उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
मतदारांची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST