शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनो सावधान! खोटी तक्रार केल्यास होणार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:29 IST

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे.

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे. या माध्यमातून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनवर पाच ते सहा सेंकदपर्यंत बघता येणार आहे. मात्र एखाद्या मतदाराने इव्हीएमच्या पारदर्शकतेवर तक्रार केल्यास आणि त्यात तो दोषी आढळल्यास त्याला सहा महिन्यांचा कारावास, एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून काही पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. यामुळे मतदारांंची उत्सुकता शिगेला पोहोेचली आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर केला होता. मात्र यात फेरबदल होत असल्याचा विविध राजकीय पक्षांचा आरोप होता. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाची मोठ्या प्रमाणात देशपातळीवर बदनामाही झाली. त्यानंतर फेरबदल होत असल्याचे सिद्ध करून दाखविण्याचे खुले आव्हाण आयोगाने केले होते. या प्रकारामुळे उमेदवार आणि मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. तर काही राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरद्वारे जुन्याच पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली. या मागणीला निवडणूक आयोगाने धुडकावून लावत कोणत्याही परीस्थितीत बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेतली जाणार नसल्याचे बजावले. यानंतर आयोगाने इव्हीएन मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट राहणार असून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या मतदाराला व्हीव्हीपॅटद्वारे पाच ते सात सेंकदपर्यंत उमेदवाराचे चिन्ह दिसणार आहे. असे असले तरी, काही खोळसाळ नागरिकांनी जर आपले मतदान दुसऱ्या उमेदवाराला गेल्याची तक्रार केली, तर केंद्रअधिकारी तत्काळ त्याच्याकडून एक अर्ज भरून घेणार आहे. त्या अर्जामध्ये खोटी तक्रार केल्यास ‘मी शिक्षेस पात्र राहणार’ असे लिहून घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिसात प्रकरण जाणार आहे. जर चौकशीमध्ये तक्रार खोटी किंवा दिशाभूल करणारी असेल तर त्याला भारतीय दंड संहितेनुसार १७७ कलमान्वये शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. ही शिक्षा सहा महिने कैद किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्हीही देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.अशी आहे व्हीव्हीपॅटची क्षमतामतदानानंतर व्हीव्हीपॅटद्वारे ज्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्या उमेदवाराचे चिन्ह पाच ते सात सेंकदपर्यंत मतदारांना दिसणार आहे. त्यानंतर या पॅटद्वारे चिठ्ठी निघणार असून ती पेटीमध्ये बंद होणार आहे. या व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्यांची क्षमता १ हजार ५०० आहे. म्हणजेच, एका मतदान केंद्रावर जर १ हजार १५०० पेक्षा जास्त मतदार असतील, तर त्या केंद्रावर दोनपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट ठेवण्यात येणार आहे.