दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी सर केले विदर्भातील १२ किल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:31+5:30

बघण्यासाठी फक्त डोळेचे महत्त्वाचे नाही तर श्रवण, स्पर्श, गंध, इच्छाशक्ती हेही महत्त्वाचे असल्याचे या दृष्टीबाधितांनी दाखवून दिले. ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंतच्या गडकिल्ले सर प्रवासात विदर्भातील १२ किल्ले त्यांनी सर केले. शेवटच्या दिवशीही त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद दिसून आला. माहूरगडच्या रेणुकामातेचे दर्शन घेवून प्रवासाला सुरूवात झाली.

The visually impaired students have made 12 forts in Vidarbha | दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी सर केले विदर्भातील १२ किल्ले

दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी सर केले विदर्भातील १२ किल्ले

Next
ठळक मुद्देउदंड इच्छाशक्ती : दहा दिवसांच्या अभ्यास सहलीत अचाट साहस

सचिन सरपटवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : चिखलदऱ्याच्या गावीलगडपासून राणीमहलपर्यंत पोहचण्याचा रस्ता बिकट होता. जंगली भाग होता. सरळ चढण तसेच पायºया तुटलेल्या होत्या.तीन ते चार किमीचा हा कठीण प्रवास २० दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या भरवशाावर पार केला. आपणही सक्षम आहोत हे सिद्ध केले.
बघण्यासाठी फक्त डोळेचे महत्त्वाचे नाही तर श्रवण, स्पर्श, गंध, इच्छाशक्ती हेही महत्त्वाचे असल्याचे या दृष्टीबाधितांनी दाखवून दिले. ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंतच्या गडकिल्ले सर प्रवासात विदर्भातील १२ किल्ले त्यांनी सर केले. शेवटच्या दिवशीही त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद दिसून आला. माहूरगडच्या रेणुकामातेचे दर्शन घेवून प्रवासाला सुरूवात झाली. शिंदखेडराजा किल्ला, नरनाळा किल्ला (आकोट तालुका), गावीलगड (चिखलदरा), अचलपूर व आमनेरचा (काटोल तालुका) किल्ला, रामटेकचा नगरधन किल्ला, अंबागड (भंडारा) पवनीचा किल्ला, चंद्रपूरचा चांदागड, माणिकगड किल्ला, भद्रावती येथील यौवनाश्याचा किल्ला व शेवटी आनंदवनला भेट देवून सिताबर्डी किल्ला (नागपूर), बघून या मोहिमेचा शेवट होणार आहे.
या अभ्यास मोहीमेला राष्ट्रीय अनुसंधान संयोजक (सक्षम) शिरिष दारव्हेकर, संजय दारव्हेकर, रश्मी उराडे, अरविंद शहस्त्रबुद्धे, सुजाता सरागे, इतिहास अभ्यासक व किल्ले विश्लेषक अतुल गुरू नागपूर, रोटरॅक्टचे अध्यक्ष विश्वास शेंडे, प्रकल्प संचालक विवेक सहारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच किल्ला दर्शन मोहिमेचे रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाऊनचे अध्यक्ष संदीप देशपांडे, सचिव अभिजीत देशपांडे, प्रोजेक्ट डायरेक्टर विरेंद्र पात्रीकर, रोटरी क्लबचे सदस्य समीर सहस्त्रबुद्धे, संदीप शिंदे, अनुज देसाई यांचेही मार्गदर्शन लाभले.

किल्ले सर करण्याचा आनंद अकल्पनिय होता. अभ्यासक्रमात विदर्भाच्या किल्ल्यांचा समावेश नाही. त्यामुळे याबाबत फारशी माहिती नव्हती. आज सर्व माहिती मिळाली.
-अनमोल शाहू,
दृष्टीबाधित विद्यार्थी

किल्ल्यांबद्दल फक्त एकले होते. कुठला रस्ता कुठे जातो आज माहित झाले. खूप काही शिकलो
-शबाना शेख,
दृष्टीबाधित विद्यार्थिनी

बे्रनलिपीतून किल्ल्याची माहिती
ब्रेनलिपी व ऑडीयो फाईल्स दृष्टीबाधितांच्या भ्रमणध्वनीमध्ये टाकून दिल्या आहेत. यातून त्यांना किल्ल्याची माहिती मिळते. शिवाय त्यांचे सहाय्यक प्रत्यक्ष माहिती देवून व स्पर्शाने तिथल्या वास्तुचा अनुभव देतात.

जे किल्ले आम्ही चढलो, ते सर्वांनी चढावे. दिव्यांग असलो तरी सक्षम आहोत. दुसऱ्यांनाही सक्षम बनवायचे आहे. किल्ले हे इतिहासाचा वारसा आहे. किल्ल्यांपासून दूर जायचे नाही
- सोनम ठाकरे, दृष्टीबाधित विद्यार्थी

Web Title: The visually impaired students have made 12 forts in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड